शिवरायांची प्रशासनावर पकड

शिवरायांची प्रशासनावर पकड

पुणे - छत्रपती शिवाजी महाराजांची प्रशासनावरील पकड आणि ‘शरणागतवत्सल’ वृत्तीचा प्रत्यय आणून देणारे ऐतिहासिक पत्र मोडी लिपीचे अभ्यासक राज चंद्रकांत मेमाणे यांना सापडले आहे. पत्राची सुरवात, ‘कौलनामा अजरख्तखाने राजेश्री सिवाजी राजे दामदौलतहू’...अशा फारसी मायन्याने केली आहे. पुणे परगण्यातील जेजुरीच्या सूर्याजी पाटील मालवदकर  याला शिवाजीराजांनी लिहिलेले हे पत्र आहे.

मेमाणे यांना पुणे पुरालेखागार येथील पेशवे दफ्तरात शिवाजी महाराजांचे पत्र सापडले. सदरील पत्र हे मूळ पत्राची समकालीन नकल असून, ‘कौलनामा’ म्हणजे ‘आश्वासनपत्र’ या पत्र प्रकारात ते मोडते. हे पत्र सुहुर सन समान, खमसेन व अलफ म्हणजेच इसवी सन म्हणजे महाराजांच्या राज्यभिषेकापूर्वी लिहिलेले आहे. जेजुरीचा पाटील सूर्याजी हा दौंडज्‌ गावच्या मालजी पाटील मालवदकर यास जामीन राहिला होता; परंतु मालजी पाटील फरार झाल्याने सूर्याजीस स्वतःचे पाटीलकीचे वतन विकून सरकारात रक्कम भरावी लागली. 

उपजीविकेचे साधन गेल्यामुळे तो महाराजांकडे आला. या अडचणीतून बाहेर येण्यासाठी महाराजांनी त्यास कर्ज उपलब्ध करून दिले. 

हे पत्र मूळ पत्राची नकल जरी असले तरीही या पत्राचे वैशिष्ट्य म्हणजे या पत्रातील मजकुरावरून महाराजांची आपल्या प्रशासनावरील पकड किती मजबूत होती हे समजून येते. तसेच महाराजांचा ‘शरणागतवत्सल’ हा एक वेगळाच पैलू आपल्याला या पत्राद्वारे पाहायला मिळतो. या पत्रातील घटनेचा उल्लेख छत्रपती थोरले शाहू महाराज सातारा यांच्या आज्ञापत्रात आणि थोरले बाजीराव पेशवे यांच्या अभय पत्रातही आढळून येतो. या संपूर्ण पत्राचे वाचन लवकरच भारत इतिहास संशोधक मंडळ येथे करण्यात येणार आहे. हे पत्र प्रकाशित करण्यासाठी इतिहास संशोधक मंदार लवाटे यांचे सहकार्य लाभले असल्याची माहिती मेमाणे यांनी दिली. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com