पुणे कॅंटोन्मेंट बोर्ड परिसरात शिवरायांचा पुतळा उभारणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

पुणे - पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीमध्ये पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्‍वारूढ पुतळा बसविण्यात येणार आहे. गोळीबार मैदान चौकाच्या बाजूला कॅंटोन्मेंट कार्यालयाच्या आवारात हा पुतळा बसविणार आहे.

पुणे कॅंटोन्मेंटवासीयांना शिवाजीनगर येथील श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूलच्या आवारातील महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी यावे लागते. लोकांच्या आग्रहामुळे कॅंटोन्मेंट परिसरातच महाराजांचा पुतळा बसविण्यात यावा, या संदर्भात बोर्डाचे सदस्य दिलीप गिरमकर, अतुल गायकवाड यांच्यासह सर्वच सदस्यांनी बोर्ड प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता.

पुतळा बसविण्यास बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडिअर ए. के. त्यागी व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एन. यादव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी हा पुतळा कॅंटोन्मेंट कार्यालयाच्या आवारातच बसविण्यासंदर्भात हिरवा कंदील देण्यात आला आहे. 

दहा फूट चौथऱ्यावर सात फूट उंचीचा अश्‍वारूढ पुतळा असेल. गिरमकर म्हणाले, ‘‘कॅंटोन्मेंटच्या आवारात पहिल्यांदाच शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविला जाणार आहे. लोकवर्गणीतून जमा झालेला निधी पुतळ्यासाठी वापरण्यात येणार आहे. येत्या तीन महिन्यांत पुतळ्याचे काम होईल.’’

Web Title: shivaji maharaj statue in pune cantonment board area