नवनिर्वाचित नगरसेवकांची शिवनेरीवर शपथ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मार्च 2017

आमदार लांडगे यांच्या समर्थकांचा निष्ठा आणि प्रामाणिक कारभाराचा संकल्प

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेत एकहाती सत्ता आल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे आमदार महेश लांडगे यांच्या आळंदी आणि पिंपरी-चिंचवडमधील समर्थक असलेल्या ४१ नवनिर्वाचित नगरसेवकांनी शिवनेरी गडावर निष्ठा आणि प्रामाणिक कारभाराची शपथ घेतली.

ऐतिहासिक शिवनेरी किल्ल्यावर शुक्रवारी (ता. २) हा शपथ ग्रहण कार्यक्रम झाला. आमदार लक्ष्मण जगताप आणि लांडगे यांनी भाजपला महापालिकेत स्पष्ट बहुमत (७७ जागा) मिळवून दिले. भोसरी विधानसभा मतदारसभाअंतर्गत एकूण ४४ जागांची आमदार लांडगे यांनी जबाबदारी घेतली आहे. 

भोसरीचा परिपूर्ण विकास करण्याचा संकल्प केला असून, त्यासाठी ‘भोसरी व्हीजन-२०२०’ हे महत्त्वाकांक्षी अभियान हाती घेतले आहे, असे आमदार लांडगे म्हणाले. 

सत्तेत मश्‍गूल न होता भोसरीचा परिपूर्ण विकास करण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाने कटिबद्ध राहावे, विकासाच्या मुद्द्यावर भाजप आणि आमदार लांडगे यांच्यासोबत निष्ठेचे काम करावे, अशी प्रतिज्ञा सर्वांनी घेतली.

या वेळी लांडगे यांनी गडावरील शिवाई मातेच्या मंदिरात सकाळी ७ वाजता अभिषेक केला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर ज्येष्ठ पदाधिकारी विजय फुगे यांनी आळंदी नगर परिषद आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नवनिर्वाचित भाजप नगरसेवकांना एकनिष्ठता आणि प्रामाणिक कारभाराची शपथ दिली.    

मी भोसरीच्या परिपूर्ण विकासाचे स्वप्न डोळ्यांसमोर ठेवून विधानसभा निवडणूक लढवली. नागरिकांनीही माझ्या प्रामाणिक कार्यावर विश्वास ठेवला. त्याच विश्वासाने भाजपचे सर्वाधिक नगरसेवक महापालिकेत निवडून दिले आहेत. आता आम्ही पक्षाचे निष्ठावान शिलेदार पारदर्शी व प्रामाणिक कारभाराची शपथ घेतली आहे. 
- महेश लांडगे, आमदार, भोसरी

‘कुसूर’ची पाहणी
आमदार महेश लांडगे यांनी आमदार आदर्श ग्राम योजनेअंतर्गत ऐतिहासिक कुसूर गाव दत्तक घेतले आहे. शुक्रवारी या गावात केलेल्या विविध विकासकामांची पाहणी करण्यात आली.

Web Title: Shivneri on oath new corporators