सोळा वर्षीय समृद्धीच्या शिरपेचात मानाचा तुरा,पिकी शिखर सर

samruddhi-bhtkar
samruddhi-bhtkar

पुणे - पोलादपूर येथील रहीवासी असलेली आणि पुणे आबासाहेब गरवारे कॉलेजची विद्यार्थीनी समृद्धी प्रशांत भूतकर हिने नेपाळ येथील 15 हजार फूट उंचीवरील पिकी शिखर नुकतेच यशस्वीपणे सर केले. यापूर्वी समृद्धीने वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी 17 हजार फूट उंचीवरील फ्रेंड्स शिप शिखर सर करून विश्वविक्रम केला व सर्वात लहान गिर्यारोहक होण्याचा मान मिळवला होता. 

पुणे येथील गिर्यारोहण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या सुप्रसिद्ध गिरिप्रेमी संस्थेबरोबर सहभागी होऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिने पोलादपूर ते काठमांडू असा प्रवास केला. तेथून 25 एप्रिलला काठमांडू ते जिप्रो हा अतिशय खडतर व घातक प्रवास तीने केला आहे. हा खडतर प्रवास करताना तिला ढगाळ वातावरण व हिमवर्षावाला तोंड द्यावे लागले. यावर मात करत समृद्धीने तीन दिवसानंतर 28 एप्रिलला दुपारी साडे बारा वाजता पिकी शिखरावर पाय ठेऊन भारताचा तिरंगा फडकविला. सहभागी सदस्यांसहीत भारत माता की जय असा जयघोष योवोळी गिर्यारोहकांनी केला. 

या मोहीमेत हेतल अगसकर, समृद्धी भूतकर, प्रशांत भूतकर, भोलाराम शेर्पा, चिरी शेर्पा यांनी सहभाग घेतला. समृद्धी ही कर्तव्य प्रतिष्ठान, यंग ब्लडस ऍडव्हेंचर्स पोलादपूर या संस्थेची सभासद असुन, गिरिप्रेमी पुणे, सिस्केप महाड या संस्थेच्या मोहीमेत तिने सहभाग नोंदवला आहे. मुळात या क्षेत्रात घरचे वातावरण देखील प्रेरणादायी आहे. समृद्धीचे वडील देखील तिच्या मोहीमांमध्ये सहभागी होतात. या पूर्वी समृद्धीने एव्हरेस्ट बेसकॅम्पसह हिमालयातील इतर सहा शिखरे व चार हिमालयीन मोहिमांचे यशस्वीपणे नेतृत्व केले आहे. तसेच सह्याद्रीतील ऐतिहासिक अभ्यासाच्या शोधमोहिमा व अनेक गड किल्ल्यांवर भटकंती कोली आहे. रायगड व प्रतापगड प्रदक्षिणा असे तिचे गेल्या सहा वर्षात गिर्यारोहण क्षेत्रातील योगदान आहे.  

समृद्धीच्या गिर्यारोहण क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन अनेक सामाजिक संस्थांनी, संघटनांनी तसेच शासकीय स्तरावर तिला सन्मानितही केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com