स्लिप, केंद्रांचा यंदाही गोंधळ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

पुणे - प्रत्यक्ष मतदानाच्या  आदल्या दिवसापर्यंत (सोमवार)  निवडणूक आयोगाकडून शंभर टक्के स्लिपांचे वाटप झाले नसल्याचे समोर आले आहे.

मतदान केंद्र तेच आहे, की त्यामध्ये बदल झाला आहे. येथपासून ते एकाच कुटुंबातील व्यक्तींची नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रांत गेले असून, त्याचा परिणाम मतदानाच्या टक्‍केवारीवर होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. २१) मतदान होत आहे. मतदारांना स्लिपवाटपाचे काम यंदा निवडणूक आयोगाने स्वत:कडे घेतले असूनही शहरातील अनेक भागांत अद्याप स्लिपांचे वाटप झालेले नाही.

लोकसभा निवडणुकीदरम्यान असा प्रकार घडला होता. त्यामुळे मतदार स्लिपवाटपाच्या जबाबदारीतून केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रशासनाची सुटका केली होती. हे निदर्शनास आणून दिल्यानंतरही राज्य निवडणूक आयोगाने स्लिपवाटपाची जबाबदारी प्रशासनाचीच असल्याचा आग्रह कायम ठेवला. त्यामुळे हा गोंधळ झाला असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी एकीकडे प्रयत्न करणाऱ्या राज्य निवडणूक आयोगाला स्लिपवाटपाच्या हट्टापायी फटका बसण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.
 
क्षेत्रीय कार्यालय आणि केंद्र अध्यक्षांच्या माध्यमातून स्लिपावाटपाचे काम सुरू आहे. गेल्या चार दिवसांपासून हे काम सुरू करण्यात आले असून, सर्व मतदारांपर्यंत त्या पोचवाव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. शंभर टक्के स्लिपांचे वाटप करण्यात येईल.
- सतीश कुलकर्णी, निवडणूक निर्णय अधिकारी

मतदार याद्यांत चुका 
चार वॉर्डांचा मिळून एक प्रभाग या पद्धतीने मतदान होणार असल्याने काही मतदान केंद्रांमध्ये बदल झाले आहेत, तर काही मतदान केंद्रे नव्याने तयार केली आहेत. 

प्रभागनिहाय मतदार याद्या फोडताना अनेक ठिकाणी गोंधळ झाला असून, मतदार याद्यांत अनेक चुका आहेत. 

या पार्श्‍वभूमीवर मतदारांची मदार आयोगाकडून मिळणाऱ्या स्लिपांवर आहे. असे असतानाही आयोगाकडून शंभर टक्के वाटप झाले नाही. 

मतदार स्लिप न मिळाल्याच्या तक्रारी ‘सकाळ’  कार्यालयात काही नागरिकांनी केल्या आहेत. परिणामी, मतदान केंद्र कुठे आहे, असा प्रश्‍न मतदारांपुढे उभा राहिला आहे. 

निवडणूक अधिकाऱ्यांकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी ही सर्व जबाबदारी क्षेत्रीय कार्यालयांवर असल्याचे सांगून हात झटकले आहे. त्यामुळे शहरात नेमके किती टक्के स्लिपांचे वाटप झाले, याची एकत्रित माहिती मिळत नाही. 

पुणे

जुन्नर : जुन्नर तहसील कार्यालयातील अभिलेख कक्ष आज (बुधवार) कार्यालयीन वेळेत बंद असल्याने विविध गावातून येथे कामासाठी आलेल्या...

03.21 PM

पुणे : पुण्यातील यंदाचा गणेशोत्सव,  शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष साजरा करतोय आणि त्या निमित्ताने पुणे महानगरपालिका हा...

01.33 PM

पुणे - जुन्नरजवळ आळेफाटा हद्दीत वडगाव आनंद येथे मध्यरात्री दीडच्या सुमारास मोटारीने अचानक पेट घेतल्याने मोटारीतील तिघांचा होरपळून...

09.42 AM