स्मार्ट सिटीतील नागरीकांची स्मार्ट आरोग्य तपासणी

दिलीप कुऱ्हाडे
बुधवार, 13 जून 2018

येरवडा - महापालिकने ‘स्वस्थ पुणे, स्मार्ट पुणे’ अंतर्गत कावीळ,अतिसार, स्वाईन फ्ल्यू, क्षयरोग असे आजार टाळण्यासाठी व जनजागृतीसाठी आरोग्य तपासणी विशेष मोहिम सुरू केली आहे. या अंतर्गत प्रभागातील दीड हजार नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी चक्क दहा लाख रूपयांची उधळपटी केल्याचे समोर आले आहे. 

येरवडा - महापालिकने ‘स्वस्थ पुणे, स्मार्ट पुणे’ अंतर्गत कावीळ,अतिसार, स्वाईन फ्ल्यू, क्षयरोग असे आजार टाळण्यासाठी व जनजागृतीसाठी आरोग्य तपासणी विशेष मोहिम सुरू केली आहे. या अंतर्गत प्रभागातील दीड हजार नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी चक्क दहा लाख रूपयांची उधळपटी केल्याचे समोर आले आहे. 

पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत रुग्णालये, दवाखाने, तज्ज्ञ डॉक्टरांच्या ताफ्यासह शेकडो आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या आहे. मात्र महापालिकेने ‘स्वस्थ पुणे, स्मार्ट पुणे’ या टँगलाईनखाली एका खासगी कंपनीला सांसर्गिक व असांसर्गिक आजाराच्या जनजागृतीसाठी व नागरिकांच्या आरोग्य तापसणीचा ठेका दिला आहे. श्रावण मेडटेक प्रा.लि. या कंपनी महापालिकेच्या प्रभागात नुकतीच जनजागृती व नागरिकांची आरोग्य तपासणी केली आहे. यासाठी प्रत्येक प्रभागात गेल्यावर्षी व यावर्षीच्या अर्थसंकल्पात प्रत्येकी दहा लाख रूपयांची विशेष तरतूद केली आहे. 

शहरातील कळस-विश्रांतवाडी-धानोरी (प्रभाग क्रमांक १-ब) मध्ये नुकतीच ही स्मार्ट मोहिम राबविण्यात आली. सांसर्गिक व असांसर्गिक आजार अर्थात कावीळ, अतिसार, स्वाईन फ्लू आण क्षयरोग टाळण्यासाठी केवळ प्रभागातच जनजागृती करण्यात आली. त्यानंतर एका ठरावीक दिवशी ( २६ मार्च ) तब्बल दीड हजार नागरिकांची आरोग्य तपासणी केली. यामध्ये वय वर्षे तीस ते ९३ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश होता. या आरोग्य तपासणी मोहिमेची सत्यता दर्शविण्यासाठी स्थानिक आमदार उपस्थित असल्याचे छायाचित्र जोडण्यात आले. त्यानंतर अवघ्या पाच दिवसात अर्थात ३१ मार्चला दहा लाख रूपयांचे बील सुद्धा काढण्यात आले.

येरवडा क्षेत्रीय कार्यालयात झालेल्या आरोग्य शिबिराला भेट दिली होती. यावेळी पंचवीस ते तीसजण आरोग्य तपासणी करीत होते त्यापैंकी बहुतेक महापालिकेचे कर्मचारी होते.’’
- डॉ. दिपक पखाले, वैद्यकीय अधिकारी, येरवडा क्षेत्रीय कार्यालय

आरोग्य जनजागृती मध्ये शाळा, महाविद्यालय, सोसायट्यांमध्ये प्रचार व प्रसार करणे आवश्यक होते. फलक व बॅनर सुध्दा प्रभात दिसले नाहीत.
- विवेक जाधव , रहिवासी, धानोरी

Web Title: Smart Health Inspection of Smart City Citizens