‘स्नॅक्‍स रेसिपी शो’चे शनिवारपासून आयोजन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मार्च 2017

पुणे - वर्षभर डब्यामध्ये कटाक्षाने पोळी- भाजी नेणाऱ्या मुलांचे, उन्हाळ्याच्या सुटीत खाण्याचे लाड कसे पुरवायचे, हा यक्ष प्रश्‍न तमाम गृहिणींना पडतो. या प्रश्‍नाचे पौष्टिक व वैविध्यपूर्ण उत्तर देण्यासाठीच सकाळ मधुरांगण, बिग बझारतर्फे प्रख्यात शेफ विष्णू मनोहर यांचे ‘लाइव्ह इनोव्हेटिव्ह स्नॅक्‍स रेसिपी शो’चे आयोजन केले आहे.

हा शो मधुरांगण सभासदांना विनामूल्य असून, ओळखपत्राबरोबरच फोन, व्हॉट्‌सॲपवर नावनोंदणी करणे आवश्‍यक आहे. 

सकाळ वाचक महिलांसाठी प्रवेश शुल्क रुपये ३०० असेल. कार्यक्रमस्थळी महिलांना रेसिपी प्रिंटआऊट रुपये ३० ला मिळतील. 

विष्णू मनोहर हे डायट दही वडा, पो टोमॅटो वडा, रोल सॅंडवीच, गजरेला, चीज मॅंगो बाइट, चिली कॉर्न, क्रिस्पी पोटॅटो आदी रेसिपी शिकविणार आहेत. करायला अतिशय सोप्या, पौष्टिक, रुचकर व वैविध्यपूर्ण अशा अनेक पाककृती या कार्यशाळेत शिकता येणार आहे.

पुणे विभाग -
कुठे - बिग बझार, अभिरुची मॉल, सिंहगड रस्ता
कधी - शनिवार, ता. १ एप्रिल, दुपारी २.३० वा.

पिंपरी- चिंचवड विभाग -
कुठे - बिग बझार, प्रीमियर प्लाझा, आयसीआयसीआय बॅंकेजवळ, चिंचवड 
कधी - रविवार, ता. २ एप्रिल, दु. २.३० वा.

नावनोंदणीसाठी संपर्क - ९०७५०१११४२, ८३७८९९४०७६ (वेळ - सकाळी ११ ते सायं. ६) 
व्हॉट्‌सॲपवर नावनोंदणीसाठी - ७७२१९८४४४२