विद्यापीठाच्या 14 इमारतींवर साकारणार सौरऊर्जा प्रकल्प 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

पुणे  - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये रूफटॉप सौरऊर्जा प्रकल्प राबवण्याचा निर्णय पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने घेतला आहे. त्यासाठी क्षेत्रात शासकीय पॅनेलवर असलेल्या एका कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे. 

विद्यापीठातील 14 इमारतींवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी क्‍लीनमॅक्‍स एन्व्हायरो एनर्जी सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसोबत 25 वर्षांचा ऊर्जा खरेदी करार केला आहे. सरकारी संस्थांमध्ये अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर व्हावा, हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. सुमारे 602 किलोवॉट अवर्स क्षमतेचा हा प्रकल्प असून, तो सेकीच्या रेस्को मॉडेलप्रमाणे सुरू करणार आहे. 

कुलगुरू डॉ. नितीन करमळकर म्हणाले, ""पुणे स्मार्ट सिटीच्या सहकार्याने विद्यापीठ परिसर इको-फ्रेंडली बनविण्याचे आम्ही ठरवले आहे. हे उद्दिष्ट गाठण्याच्या दृष्टीने पहिल्या टप्प्यात पब्लिक बायसिकल शेअरिंग सेवा यशस्वी ठरली आहे. आता आम्ही विद्यापीठाला सौरऊर्जेने समर्थ करण्यासाठी आम्ही पाऊल उचलले आहे.'' 

पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप म्हणाले, ""विद्यापीठाला स्मार्ट बनवण्याचा आम्ही निश्‍चय केला आहे. या दिशेने पुढे जाण्यासाठी विद्यापीठाच्या सहकार्याने येथे आम्ही आणखी उपक्रम राबवणार आहोत आणि पुण्याला स्मार्ट सोलर शहर बनवण्यासाठी सौरऊर्जेचे हे मॉडेल शहराच्या इतर भागांमध्ये राबवण्यात येईल.'' 

विकसक कंपनी करणार गुंतवणूक 
या प्रकल्पासाठी विद्यापीठाला कोणताही खर्च येणार नाही. विकसक कंपनी त्यासाठी सुमारे तीन कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. विद्यापीठाच्या दरमहा एकूण ऊर्जा वापराच्या 10 टक्के वीज या प्रकल्पातून निर्माण होईल. या ऊर्जेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 3 रुपये 62 पैसे प्रति युनिट अनुदानित दर देईल. 

Web Title: Solar Power Project will be set up on 14 buildings of the University