अभिनयाची विशेष कार्यशाळा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 मे 2017

पुणे - अभिनयाची २ शनिवार आणि २ रविवार घेतली जाणारी विशेष कार्यशाळा २० मेपासून सुरू होत आहे. नाटक, चित्रमालिका आणि चित्रपटासाठी अभिनय करताना आवाज, शब्दफेक, संवाद, वाचिक अभिनय, मुकाभिनय अशा अनेक बाबी या कार्यशाळेत प्रात्यक्षिक स्वरूपात घेण्यात येतील. या कार्यशाळेचे मार्गदर्शन सुप्रसिद्ध अभिनेत्या मधुरा वेलणकर आणि ऋजुता देशमुख करणार आहेत. या कार्यशाळेचे प्रवेश शुल्क दहा हजार रुपये आहे. १७ मेपर्यंत प्रवेश घेतल्यास १००० रुपयांची सवलत मिळेल. अधिक माहितीसाठी संपर्क : ७७२२०११३२९

उत्कृष्ट संस्थेच्या विकासासाठी ‘कॉम्पिटन्सी मॉडेल्स’ प्रशिक्षण
कोणतीही संस्था असो वा कंपनीची यशस्वी वाटचाल ही योग्य कौशल्य तसेच उत्तम ज्ञान असलेल्या कर्मचाऱ्यांवर अवलंबून असते. त्यामुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता ओळखून त्यानुसार त्यांचा उपयोग करून घेतल्यास कंपनी वा संस्थेच्या प्रगतीसाठी जास्त फायद्याचे ठरू शकते. अशा कर्मचाऱ्यांची भरती कशी करावी, त्यांची कार्यक्षमता कशी ओळखावी, त्यांचा विकास करून संस्थेची प्रगती कशी करावी, याविषयी मार्गदर्शन करणारे ‘कॉम्पिटन्सी मॅपिंग अँड डेव्हलपमेंट’ हे दोन दिवसांचे प्रशिक्षण २० आणि २१ मे रोजी आयोजिले आहे. यात एचआर प्रोफेशनल्स, सीईओ, सीएचआरओ, ट्रेनर्स, प्रोफेसर्स, सीनिअर मॅनेजर्स, उद्योजक इत्यादी सहभागी होऊ शकतात. प्रशिक्षणात कॉम्पिटन्सी असेसमेंट टुल्स, फ्लो चार्ट ऑफ कॉम्पिटन्सी मॅपिंग, स्किल मेट्रिक, वैयक्तिक कार्यक्षमता ओळखणे, कस्टमाईज कॉम्पिटन्सी मॉडेल इत्यादीविषयी लेखी तसेच प्रॅक्‍टिकलसह मार्गदर्शन होईल. प्रतिव्यक्ती चार हजार आठशे पन्नास रुपये शुल्क आहे.
संपर्क - ९१३००७०१३२ / ८८८८८३९०८२

Web Title: special workshop for acting