अकरावी सायन्सला प्रवेश घेणाऱ्यांसाठी रविवारी मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 जून 2017

पुणे - सकाळ विद्या आणि "बनकर कोचिंग इन्स्टिट्यूट'तर्फे अकरावी सायन्स क्षेत्रातील संधींबाबत विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवारी (ता.18) हडपसर येथील कर्मवीर सभागृह, साधना विद्यालय येथे हे चर्चासत्र होणार आहे. अकरावी सायन्समध्ये करिअर करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ही कार्यशाळा कमालीची महत्त्वाची ठरणार आहे.

दहावी आणि बारावीच्या महत्त्वाच्या टप्प्यांवर घेतल्या जाणाऱ्या निर्णयावरच विद्यार्थ्यांची पुढील वाटचाल निश्‍चित होत असते. मात्र, नेमकी वाटचाल कशी करावी, याबाबत बहुतेक विद्यार्थ्यांसह पालकांच्याही मनात संभ्रम असतो. बारावीनंतर
अनेकांना अभियांत्रिकी किंवा आयआयटीमध्ये प्रवेश घ्यायचा असतो. त्यासाठी आयआयटी जेईई मेन्स आणि ऍडव्हान्स प्रवेश परीक्षा लागू करण्यात आल्या आहेत. दहावीनंतर इंजिनिअरिंग, मेडिकल, रिसर्च, सायन्समधील करिअरच्या संधी, त्यांच्या प्रवेशप्रक्रिया, त्यांचा अभ्यासक्रम व बदललेले स्वरूप, कशी करावी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील सायन्समधील करिअरची विविध क्षेत्रे व संस्था व त्यांच्या प्रवेशप्रक्रिया, बदलते शैक्षणिक धोरण व नवीन परीक्षापद्धती अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन मिळणार आहे. अनेकांना या सर्व परीक्षेतील बारकाव्यांविषयी मार्गदर्शन अपेक्षित असते. अकरावीमध्ये प्रवेश घेतानाच अशा अनेक प्रश्‍नांचा गोंधळ विद्यार्थी व पालकांच्या मनात झालेला असतो. या प्रवेशपरीक्षांचे बदललेले स्वरूप आणि विद्यार्थी व पालक यांच्यापुढे असणारी आव्हाने यांविषयी मार्गदर्शन करण्यासाठी "सकाळ विद्या' आणि "बनकर कोचिंग इन्स्टिट्यूट'तर्फे ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत करिअरतज्ज्ञ प्रा. विजय नवले व बनकर क्‍लासेसचे संचालक जितेंद्र बनकर मार्गदर्शन करणार आहेत.

दिनांक : रविवार, ता. 18 जून 2017
वेळ : सकाळी 9.30 वा.
स्थळ : कर्मवीर सभागृह, साधना विद्यालय, माळवाडी, हडपसर
मार्गदर्शक : करिअरतज्ज्ञ प्रा. विजय नवले, बनकर क्‍लासेसचे संचालक जितेंद्र बनकर
विद्यार्थी व पालकांना प्रवेश विनामूल्य.