"स्थायी'साठी भाजपकडून मोहोळ यांना उमेदवारी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मार्च 2017

पुणे - महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाने नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांचे नाव निश्‍चित केले आहे, तर या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांची आघाडी झाली असून, राष्ट्रवादी कॉंग्रेसने नगरसेविका रेखा टिंगरे यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेना तटस्थ राहण्याची शक्‍यता आहे.

स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी येत्या 29 मार्चला निवडणूक होणार असून, त्याची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू झाली. त्यासाठी मोहोळ यांनी दुपारी अर्ज भरला. महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर नवनाथ कांबळे, पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, नगरसेवक सुनील कांबळे यांच्यासह पक्षाचे नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते. तर, टिंगरे यांच्यासमवेत महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे, कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, माजी महापौर चंचला कोद्रे आदी उपस्थित होते.

स्थायी समितीत भाजपचे सर्वाधिक दहा, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 4 सदस्य आहेत, तर कॉंग्रेस आणि शिवसेनेचा प्रत्येकी एक सदस्य आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या अध्यक्षपदी मोहोळ यांची निवड निश्‍चित आहे.