कटफळच्या दिनेशला राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक

संतोष आटोळे
शनिवार, 21 एप्रिल 2018

कटफळ (ता. बारामती) येथील पै. दिनेश भाऊसाहेब मोकाशी याने स्व. खाशाब जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा 2018 मध्ये सुवर्णपदक मिळविले.

शिर्सुफळ : कटफळ (ता. बारामती) येथील पै. दिनेश भाऊसाहेब मोकाशी याने स्व. खाशाब जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा 2018 मध्ये सुवर्णपदक मिळविले. त्याच्या यशाबद्दल सर्व स्तरावरुन अभिनंदन होत आहे. कांदिवली मुंबई येथे पार पडलेल्या स्व.खशाब जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा 2018 मध्ये राज्यभरातील मल्लांनी सहभाग घेतला.

कटफळ गावचा सूपुत्र कु. पै. दिनेश भाऊसाहेब मोकाशी यांनी 72 किलो (गिक्रो रोमन) कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. दिनेश हा पुणे येथील आंतराष्ट्रीय कुस्ती केंद्र अर्जुन पुरस्कार विजेते पै. काका पवार याच्या नेतृत्वाखाली सराव करत आहे. दरम्यान, त्याचा या यशाबद्दल कटफळ ग्रामपंचायतीच्या सरपंच सारिका भारत मोकाशी, उपसरपंच शरद कांबळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांच्या वतीने त्याचे अभिनंदन करण्यात आले.

Web Title: State level Wrestling Competition Dinesh Mokashi won Gold Meddle