सासवडला 330 तांदळाच्या पोत्यांसह ट्रकची चोरी

श्रीकृष्ण नेवसे
मंगळवार, 29 मे 2018

सासवड (पुणे) : पुरंदर तालुक्यात स्वस्त धान्य दुकानांच्या वितरणासाठी आणलेला सुमारे 330 पोती तांदुळ ट्रकसह सासवड (ता. पुरंदर) शहरातील शासकीय गोडाऊनसमोरुन चोरीला गेल्याची घटना सासवड पोलीस ठाण्यात नोंदविली. सुमारे 3 लाख 33 हजार रुपये किंमत तांदुळ व ट्रकची गृहीत धरुन तसा गुन्हा नोंदविला आहे. 

आनंदा गंगाराम मदने (रा. खामगाव, ता. दौंड) असे ट्रक मालक व चालक यांचे नाव असून त्यांनीच काल (ता. 28) रात्री सासवड पोलीस ठाण्यात तांदळासह ट्रक चोरी गेल्याची फिर्याद दिली. ता. 25 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता आनंदा मदने यांनी फुरसुंगी (ता. हवेली) येथील शासकीय गोडाऊनमधून ट्रकमध्ये (एमएच 42 बी 7060) सुमारे 330 पोती तांदुळ भरला. हा तांदुळ सासवडला आणला. मात्र ता. 25 ला उशिरा आल्याने सासवडचे शासकीय गोडाऊन बंद होते. तर ता. 26 व 27 रोजी सुट्टी असल्याने.. त्यांनी तिथेच गोडाऊनसमोर ट्रक लावला. मधून मधून ते ट्रक चेक करीत होते. मात्र ता. 27 रोजी सायंकाळी पाचला मदने यांनी ट्रक पाहीला., तो ट्रक ता. 28 रोजी सकाळी दहा वाजता मात्र गोडाऊन समोर नव्हता. त्यांनी खुप शोध घेतला. तरीही ट्रक मिळून आला नाही. त्यामुळे काल ता. 28 रोजी रात्री येऊन मदने यांनी मालासह ट्रक चोरीला गेल्याची फिर्याद नोंदविली. याबाबत अधिक तपास पोलीस उप निरीक्षक संदीप गोसावी हे तपास करीत आहेत.  

Web Title: steal a truck with 330 rice bags from saswad