स्टोरी टेलिंग फेस्टिव्हल आजपासून सुरू 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

पुणे - गोष्टींच्या जगात फिरायला प्रत्येकालाच आवडते. हीच सफर घडवून आणण्यासाठी "सकाळ वायआरआय'ने आयोजित केलेल्या "इंटरनॅशनल स्टोरी टेलिंग फेस्टिव्हल'ला शुक्रवारपासून (ता.18) सुरवात होत आहे. दोन दिवस चालणारे हे फेस्टिव्हल येरवडा येथील ईशान्य मॉलमध्ये होणार आहे. मुले आणि पालकांबरोबरच गोष्ट ऐकण्या-सांगण्याची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठी हे फेस्टिव्हल सुवर्णसंधी ठरणार आहे. 

फेस्टिव्हलच्या या तिसऱ्या वर्षी तब्बल नऊ स्टोरी टेलर भन्नाट कथा सादर करणार आहेत. महोत्सवात सहभागी होण्यासाठी ईशान्य मॉलमध्ये नोंदणी सुरू आहे. शाळा, कॉर्पोरेट आणि महाविद्यालयांना समूह नोंदणीही करता येणार आहे. शॅडो व अन्य पपेट, कॉस्च्युम, पेपर स्टोरीज अशा विविध प्रकारांनी फेस्टिव्हलमध्ये कथा सादर होतील. मुलांसाठी कथा, तर पालक आणि शिक्षकांसाठी कार्यशाळांचेही आयोजन केले आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला या फेस्टिव्हलमधून काही ना काही मिळणार आहे. 

प्रत्येक वयोगटामध्ये वेगवेगळे स्टोरी टेलर गोष्ट सांगणार आहेत. त्यामध्ये प्लेग्रुप ते सीनियर केजीतील विद्यार्थ्यांना जिवा रघुनाथ (भारत) आणि रोझमेरी सोमाह (सिंगापूर), पहिली ते तिसरीतील विद्यार्थ्यांना करेन ली (सिंगापूर) आणि रोझली बेकर अँड टीम (यूएसए), चौथी आणि पाचवीच्या विद्यार्थ्यांना तान्या बॅट, पीटर फोर्स्टर (न्यूझीलंड) आणि च्यूह अ लिन (सिंगापूर), सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांना जूम फानिडा (थायलंड) आणि जेफ गेरे (हवाई), तर आठवी व त्यापुढील इयत्तेच्या विद्यार्थ्यांना क्रेग जेनकिन्स गोष्टी सांगणार आहेत. महोत्सवाची सांगता ईशान्य मॉलच्या ऍम्फी थिएटरमध्ये जगभरातील स्टोरी टेलर्सच्या भन्नाट कार्यक्रमाने होणार आहे. शनिवारी सायंकाळी 5 ते 6.30 या वेळेत होणारा हा फॅमिली शो पालक व मुलांसाठी खुला राहणार आहे. ईशान्य मॉल या महोत्सवाचे व्हेन्यू पार्टनर आहेत. 

इंटरनॅशनल स्टोरी टेलिंग फेस्टिव्हल 
कधी : शुक्रवार (ता. 18) आणि शनिवार (ता. 19) 
कुठे : ईशान्य मॉल, येरवडा, पुणे 
मर्यादित प्रवेश