उन्हाळ्यासाठी खास कपड्यांचा ‘ट्रेंड’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

पुणे - उन्हाळा म्हटले, की फिकट रंगाचे कपडे, या नेहमीच्या ईक्वेशनमध्ये आता विविध ‘ट्रेंड’ने रंग भरला आहे. यात फिक्‍या रंगासोबत प्रिंटेड कपड्यांचा ट्रेंड आला आहे. लाइट कलर प्लस बोल्ड प्रिंटचे... नवीन काँबिनेशन बाजारात उपलब्ध झाले आहेत. थोडी स्टाइल आणि थोडा कम्फर्ट, असा प्रकार या उन्हाळ्यासाठी खास वैशिष्ट्य ठरत आहे.

पुणे - उन्हाळा म्हटले, की फिकट रंगाचे कपडे, या नेहमीच्या ईक्वेशनमध्ये आता विविध ‘ट्रेंड’ने रंग भरला आहे. यात फिक्‍या रंगासोबत प्रिंटेड कपड्यांचा ट्रेंड आला आहे. लाइट कलर प्लस बोल्ड प्रिंटचे... नवीन काँबिनेशन बाजारात उपलब्ध झाले आहेत. थोडी स्टाइल आणि थोडा कम्फर्ट, असा प्रकार या उन्हाळ्यासाठी खास वैशिष्ट्य ठरत आहे.

 उन्हाळ्यात सुती आणि फिक्‍या रंगाचे कपडे घातले जातात. सुती कपड्यांच्या विविध व्हरायटी बाजारात उपलब्ध आहेत. फिक्‍या रंगांच्या कपड्यांमध्ये ‘प्रिंट पॅटर्न’ वापरून पाहा. फुलांची डिझाइन, वेगवेगळे शब्द, लॅंडस्केप, निओ क्‍लासिकल, बोटॅनिकल, रेषा असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रिंट कपड्यांवर पाहायला मिळतात. उन्हाळ्यासाठी खास ॲक्वामरिन, स्कुबा ब्ल्यू, स्ट्रॉबेरी आइस, कस्टर्ड या रंगांमधील कपड्यांची रेंज बाजारात उपलब्ध आहे. 

सैलसर कपडे हे उन्हाळ्याची खासियत आहे. प्रिंटेड पलाझो पॅंट्‌स या खास उन्हाळ्यासाठी बनविल्या आहेत, असा त्यांचा कम्फर्ट आहे. पलाझो म्हणजे ‘कम्फर्ट विथ स्टाइल.’ कॉटन कुर्ती ही तुम्ही जीन्स आणि लेगिन्सवर घालू शकता. याच कुर्तीमध्ये उन्हाळा स्पेशल फिकट नारंगी, फिकट पिवळा, फिकट हिरवा हे रंग पाहायला मिळतील. सुती स्लिव्हलेस टॉप आणि प्रिंटेड कॉटन स्कर्ट, असे झकास काँबिनेशनही उपलब्ध आहेत. शॉर्ट, मध्यम आणि लाँग स्कर्टदेखील उपलब्ध आहे. फिक्‍या रंगांवरील ‘बोल्ड प्रिंट’ ही त्यांची खासियत आहे. हलक्‍या वजनाचा आणि सैल ‘शॅंब्री शर्ट’ हा एक मस्त पर्याय आहे. कोणत्याही डार्क रंगाच्या जीन्सवर हा शर्ट घालता येतो. उन्हाळ्यात घालण्यासाठीच्या शॉर्टसमध्ये विविध व्हरायटी उपलब्ध आहेत.

समर कलेक्‍शन आयडियाज 
 कॅज्युअल डेनिम लुक, 
 बोल्ड ॲण्ड ब्युटिफूल फ्लोरल प्रिंट वनपीस
 प्रिंटेड स्कर्ट विथ सिंपल टॉप्स 
 व्हाइट फ्रिंगिंग टॉप्स

स्कार्फ इज ऑलवेज बेटर 
उन्हाळा, हिवाळा या ऋतूंमध्ये स्कार्फ चेहऱ्याचे संरक्षण करतो. उन्हाळ्याच्या सध्या त्याला जास्त मागणी आहे. कुर्ते, जीन्स, टॉप्स, वेस्टर्न आउटफिट्‌स, ट्रॅडिशनल अशा सर्व पेहरावर उठून दिसतील असे स्कार्फ बाजारात आले आहेत. प्रत्येक पेहरावाला साजेसे रंग शेड्‌स, कॉटन, सिंथेटिक, सिल्क अशा विविध प्रकारांत ते उपल्ब्ध आहेत. किरकोळ बाजारात १५० रुपयांपासून स्कार्फ, स्टोल मिळत आहेत. यामध्ये बोहो स्टाइल, चंकी, क्‍लासिक, मिक्‍स प्रिंट, वेलवेट, फेदरप्रिंट, ट्रिपल फ्रिंगिंग, ॲनिमल प्रिंट, स्पार्कले असे प्रकार जास्त लोकप्रिय आहेत. 

वेस्टर्न प्रकारातील पेन्सिल स्कर्ट, हायवेस्ट स्कर्ट, लाँग स्कर्ट, पलाझो याला यंदा मागणी जास्त आहे. याशिवाय शॉर्ट आणि लाँग जम्पसूट, वनपीस, जॅकेट्‌स याला तरुणींकडून पसंती मिळत आहे. लखनवी कुर्तीजला महिलांकडून जास्त मागणी आहे.
-सुनीता धानवले, विक्रेत्या

सनगॉगल्स 
रखरखत्या उन्हाळ्यात डोळ्यांना गारवा देण्यासाठी सनगॉगल्सच्या विविध फॅशन्स प्रत्येक उन्हाळ्यात येत असतात. ‘कॅट आय’ सनग्लासेस अर्थात निमुळत्या आकाराच्या, छोट्या फक्त डोळे झाकणाऱ्या सनग्लासेस उन्हाळी पोशाखासोबत छान दिसतात. पोलका, डॉट्‌स, छोटे स्कर्टस, प्लोरल प्रिंटच्या ड्रेसेससोबत हे गॉगल्स ‘कूल’ दिसतात. याचबरोबर मोठ्या फ्रेम्सच्या सनग्लासेसला मागणी आहे. 

Web Title: Summer clothing for special Trend