आता लाट उष्णतेची!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 मार्च 2017

पुणे - राज्यात उष्णतेच्या लाटेची शक्‍यता असल्याने उष्माघातापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याच्या सूचना आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिल्या आहेत. उष्णतेच्या लाटेची माहिती देण्यासाठी जिल्हा, महापालिका, विभागीय पातळीवर नियंत्रण कक्षांनी आरोग्य विभागाच्या बरोबर एकत्रित कार्य करण्याच्या सूचना आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सुहास दिवसे यांनी दिल्या आहेत. 

काय करावे?
तहान लागलेली नसली तरीही पाणी प्या.
हलके आणि सच्छिद्र सूती कपडे वापरा.
बाहेर जाताना गॉगल्स, छत्री किंवा टोपी वापरा.
प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्या.
लस्सी, लिंबू-पाणी, ताक घ्यावे. 
रात्री खिडक्‍या उघड्या ठेवाव्यात.
कामाच्या ठिकाणी थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.
पंखे, ओले कपडे याचा वापर करावा. 
थेट सूर्य किरणांचा संबंध टाळावा.
जागोजागी पाणपोईची सुविधा करावी.

काय करू नये?
लहान मुलांना पार्क केलेल्या वाहनात बसवू नका.
दुपारी १२ ते ३.३० या वेळेत शक्‍यतो बाहेर पडू नका.
गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळा.
शारीरिक श्रमाची कामे दुपारी टाळा.
उन्हाच्या वेळेत स्वयंपाक करणे टाळा.

चक्कर येतेय?
अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम अशी लक्षणे नागरिकांनी ओळखावीत. चक्कर येत असल्यास तत्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा, असेही अावाहन केले आहे.

Web Title: summer increase