थोडी मजा आणि नवं काही

रीना पतंगे
मंगळवार, 4 एप्रिल 2017

पुणे - सुटीत काहीतरी हटके करावे, असे अभिज्ञाला वाटत होते. याबाबत तिने इंटरनेटवर सर्च केला असता तिला ‘ऑनलाइन ॲनिमेशन कोर्स’ची माहिती मिळाली. उन्हाळी सुटीमध्ये घरबसल्या ‘ॲनिमेशन’सारखा कोर्स करता येईल. या आनंदाने तिने या कोर्ससाठी तत्काळ नोंदणीही केली. अभिज्ञासारख्याच अनेक मुला-मुलींचा ऑनलाइन कोर्सेसकडे कल वाढला आहे. मनोरंजनासोबतच काही कौशल्य शिकण्यासाठी स्मार्टफोनचा उपयोग करता आला तर? हे आता शक्‍य होणार आहे. या उन्हाळी सुटीत शिकता येतील, अशा काही ऑनलाइन कोर्सेसबाबत.

फ्री आणि ऑफलाइनसुद्धा
उन्हाळी सुटीत थोडी मजा आणि थोडं नवीन काही शिक्षण्यासाठी ‘ऑनलाइन कोर्स’चे विविध पर्याय उपलब्ध आहेत. काही कोर्सेस फ्री आणि ऑफलाइनसुद्धा शिकता येतील. काही कोर्स मातृभाषेतून शिकता येतील, असे ‘इंटरॅक्‍टिव्ह’ पद्धतीने डिझाइन केले आहेत. यात शिकणाऱ्याला प्रत्यक्ष सहभागी करून घेत, गमतीदारपणे यातील लेन्स असे पुढे जात राहतात की, शिकणाऱ्यांना मजा तर येतेच शिवाय ज्ञानही मिळत जाते. तुम्ही दिलेल्या उत्तरांचे रिझल्टही ताबडतोब मिळत जातात. सगळा कोर्स मनोरंजक पद्धतीने शिकवितानाच आवश्‍यक त्या ठिकाणी उपयुक्त अशा व्याकरणाबाबतच्या प्रदर्शित होणाऱ्या टिप्स, शब्दसंग्रह, ज्ञानवर्धक गेम्ससुद्धा हे या कोर्सचे 
वैशिष्ट्य ठरते.

ग्रुप चॅटिंगची सुविधा
एखादी गोष्ट समजली नाही तर त्याबाबतीत व्हॉट्‌सॲपप्रमाणे चॅटिंगची सुविधाही असते. ‘हेल्पलाइन’चा पर्याय उपलब्ध असतो. तज्ज्ञांसोबत संवाद साधून शंकेचे समाधान करून घेता येते. या कोर्सचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे एकाच वेळी अनेकांशी चर्चा करत शिकण्यासाठी सोशल मीडियाप्रमाणे इथेही ग्रुप तयार करता येतो. 

हे आहेत पर्याय...
पाचवी ते दहावीच्या मुलांसाठी
मॅथेमॅटिक्‍स
आर्ट अँड क्राफ्ट्‌स
जनरल नॉलेज
रायटिंग स्किल
मूलभूत भौतिकशास्त्र

बारावी ते पदवीधरांसाठी
फॉरेन लॅंग्वेज
व्यक्तिमत्त्व विकास
वेब डिझाइन
फोटोग्राफी
डिजिटल मार्केटिंग
ग्राफिक्‍स डिझाइनिंग
इमर्जन्सी मॅनेजमेंट, आर्थिक नियोजन
ऑनलाइन ॲडव्हर्टायझिंग

महिलांसाठी
डिझाइनर ज्वेलरी मेकिंग
फॅशन डिझाइनर
इंटिरिअर डिझाइन

Web Title: summer vacation classes