तरुणाईला वेध ‘समर यूथ समिट’चे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

पुणे - दहावी व महाविद्यालयीन परीक्षा नुकत्याच संपल्या, आता पुढे काय? असे बरेच प्रश्‍न तरुण मंडळींना पडले असतील. आपल्यात काय विशेष आहे, याची जाणीव बहुधा आपल्यालाच नसते; मग आता कुठला पर्याय निवडावा हेच समजत नाही. म्हणून तुमचा हा गोंधळ दूर करण्यासाठी डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) या युवा व्यासपीठाने महाविद्यालयीन तरुणाईसाठी १६ मे ते १६ जून दरम्यान राज्यातील १२ शहरांमध्ये ‘यिन समर यूथ समीट’चे आयोजन केले आहे.

एकेक टप्पा पार करीत असतानाच समाज व देशासाठी काहीतरी करण्याची ऊर्मी गप्प बसू देत नाही. यासाठी युवकांना उद्योग, राजकारण, टीम बिल्डिंग, स्टार्टअप, खेळ, नवीन तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये यशस्वी ठरलेल्या व्यक्तींबरोबर थेट संवाद साधण्याची संधी देताना, भविष्यातील शैक्षणिक संधींचा वेध घेणाऱ्या तीन दिवसांच्या ‘यिन समर यूथ समीट’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दहावीनंतरचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (यिन) या व्यासपीठाच्या माध्यमातून या परिषदा होत आहेत. 

यासाठी स्पेक्‍ट्रम ॲकॅडमी मुख्य प्रायोजक आहेत. पॉवर्ड बाय हॅशटॅग क्‍लोदिंग असणाऱ्या या समीटसाठी पिंपरी- चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी- चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सुहाना मसाले, अभि ग्रुप ऑफ कंपनीज हे सहप्रायोजक आहेत.

उपक्रमाविषयी...
 कुठे - बालगंधर्व रंगमंदिर, पुणे
 कधी - २८, २९ व ३० मे 
 सुविधा - प्रवेश मोफत, थोड्याच जागा शिल्लक.
 (आजच आपला प्रवेश निश्‍चित करा.)
 शुल्क - ३०० रुपये (हवे असल्यास- किट, जेवण, आकर्षक गिफ्ट)
 सहभाग प्रमाणपत्र, ‘छत्रपती शिवाजी महाराज व पहिले बाजीराव पेशवे यांची कालातीत व्यवस्थापन तत्त्वे’ हे पुस्तक व इतर बरंच काही
 संपर्क - ९०७५००७९५८, ८६६८५३४१५१

Web Title: summer youth summit