कर्वेनगरमध्ये एका महिलेचा संशयास्पद मृत्यू

Suspected death of a woman in Karvenagar
Suspected death of a woman in Karvenagar

वारजे : कर्वेनगर मधील एका  महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. आत्महत्या केली आहे कि मारले आहे यासंदर्भात वारजे पोलीस रात्री उशिरा पर्यंत माहिती घेत होते.

यासंदर्भात वारजे माळवाडी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक (गुन्हे ) प्रकाश खांडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार रेश्मा हनुमंत कुऱ्हाडे (वय-19, रा. स्नेहांकित कॉलनी कर्वे नगर मुळगाव  विजापूर कर्नाटक) असे या मृत महिलेचे नाव आहे.

सदर महिलेने अकरा वाजता आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली त्यानंतर तिचा पती हनुमंत भिका कुराडे यांनी तिला प्रथम लोढा हॉस्पिटल व नंतर शास्वत हॉस्पिटलमध्ये दाखल केले. शास्वत हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी तिला तपासण्या पूर्वीच मृत्यू घोषित केले. अशी माहिती तिचा पती हनुमंत यांनी पोलिसांना दिली. त्यामुळे तिचा मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आलेला आहे.

रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते. दरम्यान, रेश्माने आत्महत्या केली, का तिला मारण्यात  आले हे पोस्टमार्टम  रिपोर्ट आल्यानंतरच  कळेल, अशी माहिती वारजे पोलिसांनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com