‘स्वाइन फ्लू’ रोखण्यासाठी रुग्णालयांमध्ये लस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

पुणे - शहरात पसरत असलेली ‘स्वाइन फ्लू’ची साथ रोखण्यासाठी सर्व रुग्णालयांमध्ये लस आणि पुरेशा ‘टॅमिफ्लू’ उपलब्ध केल्या आहेत. अशा रुग्णांवर तातडीने उपचार करण्याचा आदेश सर्व रुग्णालयांना दिले असून, नागरिकांनी भीती बाळगण्याचे कारण आहे, असे विश्‍वास महापालिकेचे प्रभारी आरोग्य प्रमुख डॉ. एस. टी. परदेशी यांनी गुरुवारी दिला. महापालिका रुग्णालयांमधील सुविधांचा नियमित आढावा घेण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

उन्हाची तीव्रता वाढत असतानाही शहरात गेल्या काही दिवसांपासून ‘स्वाइन फ्लू’च्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या महिनाभरात ७१ जणांना ही लागण झाली असून, आरोग्य विभागाची यंत्रणा त्याबाबतची दक्षता घेण्यात तोकडी ठरत असल्याची तक्रार महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विविध पक्षाच्या सदस्यांनी केली होती. या पार्श्‍वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून, रुग्णालयाच्या पातळीवर सर्व यंत्रणा सक्षम केली असून, सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहनही परदेशी यांनी केले. वातावरणातील बदलामुळे हा आजार वाढतो आहे. मात्र, तो आटोक्‍यात येईल, असेही त्यांनी सांगितले.