स्वारगेट ग्रेड सेपरेटरचे काम अंतिम टप्प्यात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 मे 2017

पुणे - स्वारगेट ते सारसबाग चौकादरम्यान बांधण्यात आलेल्या ग्रेड सेपरेटरचे काम अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच तो पुणे महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. औपचारिक उद्‌घाटनानंतर सार्वजनिक वाहतुकीसाठी तो खुला केला जाईल, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सांगण्यात आले.

हडपसर, कात्रज आणि सिंहगड रस्त्यावरून येणाऱ्या वाहतुकीमुळे या चौकात प्रचंड कोंडी होत होती. त्यावर तोडगा काढण्यासाठी उड्डाण पूल आणि ग्रेड सेपरेटर उभारण्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून केले जात होते. उड्डाण पुलांचे उद्‌घाटन होऊन तो वाहतुकीसाठी खुला झाला आहे. त्यापैकी हडपसरकडे जाणाऱ्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. 

‘‘केशवराव जेधे चौक ते सारसबाग चौकापर्यंत २५ कोटी रुपये खर्चून सुमारे ७५० मीटर लांबीच्या ग्रेड सेपरेटरचे काम करण्यात येत आहे. यामुळे स्वारगेट चौकातील वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होणार आहे. १५ मे रोजी पुणे महापालिकेकडे हस्तांतर केला जाईल,’’ अशी माहिती ‘एमएसआरडीसी’चे अधीक्षक अभियंता प्रशांत औटी यांनी दिली.

जिवंत पाण्याचा झरा
ग्रेड सेपरेटरचे बांधकाम करताना भूगर्भामध्ये जिवंत पाण्याचा झरा सापडला. त्याला स्वतंत्र ‘स्टॉर्म वॉटर लाइन’ बांधून ते पाणी सारसबागेत वळविण्यात 
आले आहे.