‘स्वाइन फ्लू’ची औषधे आता सर्व मेडिकलमध्ये

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 एप्रिल 2017

पुणे - स्वाइन फ्लूवर रामबाण ठरलेली औषधे राज्यातील औषध दुकानांमधून उपलब्ध होणार आहेत. त्या बाबतचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने दिले आहेत.

राज्यात जानेवारीपासून स्वाइन फ्लू झालेल्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. या रोगामुळे राज्यात आतापर्यंत ८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर स्वाइन फ्लूची औषधे आता सर्व औषध दुकानांमध्ये उपलब्ध करण्याबाबत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सूचना दिल्या आहेत, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. राज्यात गेल्या आठ वर्षांपासून स्वाइन फ्लूच्या ‘एच१एन१’ या विषाणूंचा संसर्ग वाढत आहे. या रोगावर उपचार करण्यासाठी ‘टॅमिफ्लू’ हे औषध प्रभावी 

ठरत आहे.  आतापर्यंत हे औषध ‘शेड्यूल एक्‍स’मध्ये होते. त्यामुळे या औषधांची विक्री परवानगी असलेल्या ठराविक औषध दुकानांमधूनच होत होती. गेल्या काही वर्षांपासून अशा औषध दुकानांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात आला होता. मात्र आता औषधाचा समावेश ‘शेड्यूल एच१’मध्ये केला आहे. त्या आधारावर हे औषध आता राज्यातील कोणत्याही औषध दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवता येणार आहे.

 स्वाइन फ्लूच्या प्रभावी नियंत्रणासाठी आवश्‍यक असणारे ‘ओसेलटॅमीवीर’ हे औषध इतर औषध विक्रेत्यांकडेही विक्रीसाठी उपलब्ध करण्याच्या सूचना अन्न व औषध प्रशासनाच्या मुख्यातील सहआयुक्त नि. दे. देवरा यांनी कळविले आहे. त्या आधारावर राज्यातील सर्व प्रमुख औषध दुकानांमधून स्वाइन फ्लूवरील रामबाण औषध उपलब्ध होईल, असा विश्‍वासही खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Web Title: Swine flu of medicines in all medical