'एच1एन1' विषाणूत बदल; स्वाइन फ्लूच्या साथीत वाढ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मार्च 2017

पुणे - शहरात स्वाइन फ्लूच्या आजारासाठी कारणीभूत असलेल्या "एच1एन1' या विषाणूत बदल (म्यूटेशन) झाल्याने त्याची साथ वाढत आहे. त्याबाबतचा अहवाल राष्ट्रीय विषाणू संस्थेकडून (एनआयव्ही) येणार असून, या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने विशेष काळजी घेण्याची सूचना राज्य सरकारने दिली आहे, अशी माहिती महापालिकेचे प्रभारी आरोग्यप्रमुख डॉ. एस. टी. परदेशी यांनी बुधवारी दिली.

शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत असून, या आजाराच्या मृतांचे प्रमाणही वाढले आहे. स्वाइन फ्लूचा

प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने वेगवेगळ्या पातळ्यांवर उपाययोजना आखल्या आहेत का, असा प्रश्‍न विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विचारला. त्यावर परदेशी यांनी खुलासा केला. डॉ. परदेशी म्हणाले, 'गेल्या वर्षीच्या तुलनेत या आजाराची साथ वाढत आहे. मात्र, नागरिकांनी भीती बाळगण्याचे कारण नाही. हा आजार होऊ नये, यासाठी महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये लस उपलब्ध आहे; तसेच "टॅमीफ्लू'चा पुरेसा साठा सध्या उपलब्ध आहे.'' मार्च महिन्यात स्वाइन फ्लूमुळे 12 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात शहरातील दोघांचा समावेश असल्याचे डॉ. परदेशी यांनी सांगितले.

Web Title: swine flu patinet increase