स्वाइन फ्लूमुळे दोघांचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

पुणे - शहरात स्वाइन फ्लूच्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या दोन महिन्यांमध्ये या आजाराने सहा रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सोमवारी कळविण्यात आली. 

पुणे - शहरात स्वाइन फ्लूच्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या दोन महिन्यांमध्ये या आजाराने सहा रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सोमवारी कळविण्यात आली. 

शिंदेवाडी (ता. हवेली) येथील साठ वर्षांच्या पुरुषाचा आणि ससेवाडी (ता. भोर) येथील 27 वर्षांच्या महिलेचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. या दोन्ही रुग्णांना शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. स्वाइन फ्लूची लक्षणे दिसत असल्याने त्यांच्या घशातील द्रवपदार्थाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे निदान या प्रयोगशाळेच्या अहवालातून करण्यात आले. स्वाइन फ्लूने मृत्यू झालेल्या 60 वर्षांच्या पुरुषाला गेल्या चार-पाच वर्षांपासून उच्च रक्तदाब होता. त्यावर उपचार सुरू होते. मात्र, मृत महिलेला कोणताही आजार नसल्याचे विभागातर्फे सांगण्यात आले. 

स्वाइन फ्लूने मृत्यू झालेल्या सहा रुग्णांपैकी पाच रुग्णांना उपचारांसाठी पुण्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल केले होते. यात महापालिका क्षेत्रातील एका रुग्णाचा समावेश आहे. शहरातील महापालिकांच्या रुग्णालयांमधून एक लाख 52 हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी स्वाइन फ्लूचा संशय असलेल्या एक हजार 400 रुग्णांना टॅमिफ्लू हे औषध देण्यात आले आहे. या आजाराच्या सहा रुग्णांना व्हेंटिलेटर ठेवण्यात आले असून, 25 रुग्णांना यशस्वी उपचार करून घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली.

Web Title: Swine flu two death