डॉक्‍टरांनाच उपचाराचा सल्ला 

डॉक्‍टरांनाच उपचाराचा सल्ला 

पुणे - महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांनी रुग्णालये आणि हॉस्पिटलची "तपासणी' करीत, व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी "उपचाराचा सल्ला'ही दिला. पदाधिकाऱ्यांनी अचानक भेट देऊन नोंदवह्या आणि रुग्णतपासणीची प्रक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केल्याने कर्मचारी गोंधळले. या वेळी विशेषत: प्रसूतिगृहांची पाहणी करण्यात आली. 

महापालिकेची रुग्णालये आणि हॉस्पिटलमध्ये नवनवी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असल्या तरी, रुग्णसेवेचा दर्जा सुधारत नाही, अशा तक्रारी आहेत. आरोग्य खात्यातील अधिकारी-कर्मचारी वेळेत येत नसल्याने रुग्णांना ताटकळत राहावे लागत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे महिला आणि बाळांची प्रचंड गैरसोय होत असल्याबाबत महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत चर्चा झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर समितीच्या अध्यक्ष राजश्री नवले यांच्यासह उपाध्यक्ष साईदिशा माने, रूपाली धाडवे, वृषाली चौधरी, पूजा कोद्रे, गायत्री खडके, सहायक आरोग्यप्रमुख डॉ. संजीव वावरे आदी उपस्थित होते. ""रुग्णालयात सर्व जणांना वेळेत आणि चांगले उपचार मिळाले पाहिजेत. मात्र, त्याकडे कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याच्या तक्रारी आहेत. स्वच्छतेबाबत निष्काळजीपणा होतो. या बाबी वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. त्यात आता सुधारणा करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केली आहे,'' असे नवले यांनी सांगितले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com