दुधाच्या बाटलीचा बछड्याला लळा (व्हिडिओ)

ज्ञानेश्वर रायते
बुधवार, 20 जून 2018

बारामती (पुणे) : ताडोबाच्या जंगलातील वाघांचे किस्से आजवर आपल्यापर्यंत पोचलेत. कधी जेवणाचा डबा पळव, कधी घमेलेच पळव असे बरेच उपद्‌व्याप तेथे होतात. मात्र "माधुरी" नावाच्या वाघिणीच्या बछड्याने 12 जून रोजी कमालच केली. त्याला रस्त्यात पर्यटकाची चुकून पडलेली दुधाची बाटली सापडली आणि बाटलीने दूध पिण्याचा त्या बछड्याने हट्टच केला. बाटलीला खेळतच त्याने दूध बाटलीच्या बुचाला चोखून पिण्याचा सरावही केला. बारामतीच्या पर्यटकांना दोन दिवस सलग दिसलेले हे चित्र माणूस, निसर्ग आणि जनावरांमधील बदलाची प्रचिती देत होते.

ताडोबा जंगलात अनुभवलेले हे क्षण बारामतीकरांनी कॅमेऱ्यात कैद केले. बारामतीचे हौशी निसर्ग छायाचित्रकार संदीप तावरे, सतीश परजणे, प्रवीण जगताप, अमर बोराडे, नितीन रणवरे, चेतन पाटील आदी चार दिवसांपूर्वी ताडोबाच्या जंगलात सफरीसाठी गेले होते. 11 व 12 जून रोजी त्यांनी ताडोबाची सफर केली. त्या वेळी त्यांना "माधुरी'चे दर्शन झाले. माधुरी वाघीण आपल्या चार बछड्यांसह रस्त्यावरच बसलेली असल्याने शांतपणे अर्धा तास फक्त तिला न्याहाळण्याशिवाय या पर्यटकांच्याही हातात काही नव्हते. मात्र यादरम्यानची आश्‍चर्याची गोष्ट घडली. माधुरी व तिच्या बछड्यांचे फोटो व व्हिडिओ काढताना संदीप तावरे यांच्या लक्षात आले, की एका बछड्याला रस्त्याच्या कडेला अचानक एक दुधाची बूच असलेली बाटली सापडली आहे. त्याने ती तोंडाला लावल्यानंतर त्यातून थोडे आलेले दूध त्याने पिले असावे, त्यानंतर या बाटलीत काहीतरी गोड आहे असा त्याचा समज झाला आणि त्याने त्या बाटलीचे तोंड उघडण्यास सुरवात केली. बराच वेळ तो हे तोंड उघडत होता. त्याने एकट्यानेच त्या बाटलीच्या बुचाला तोंड लावले आणि दूध गट्टम केले, असे निरीक्षण तावरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी नोंदवले.

प्लॅस्टिकची बाटली कुठून आली?
खरेतर ताडोबा जंगलात प्लॅस्टिकचे काहीही घेऊन दिले जात नाही, तेथील पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या जीपमध्येही त्याविषयी सक्ती केली जाते, मात्र अशा स्थितीत प्लॅस्टिकची बाटली तेथे आढळणे व ती वाघाच्या तोंडात जाणे हे देखील तसे गांभीर्याचेच लक्षण आहे. दुसरीकडे जंगली जनावरांनाही आता माणसाळलेल्या दुधाची गोडी वाटावी हे देखील अनोखे आश्‍चर्य सर्वांनी अनुभवले.

Web Title: tiger calf playing milk water bottle in tadoba jungle