#MissionAdmission अकरावी प्रवेश प्रक्रिया : पहिली गुणवत्ता यादी २९ जूनला

मीनाक्षी गुरव
सोमवार, 11 जून 2018

पुणे : अकरावी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. पहिली सर्वसाधारण गुणवत्ता यादी 29 जूनला जाहीर होणार आहे. त्यानंतर पहिली नियमित गुणवत्ता यादी 5 जुलैला, तर द्विलक्षी विषयाची पहिली गुणवत्ता यादी 21 जूनला जाहीर होईल 

कालावधी : वेळ : तपशील 

पुणे : अकरावी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. पहिली सर्वसाधारण गुणवत्ता यादी 29 जूनला जाहीर होणार आहे. त्यानंतर पहिली नियमित गुणवत्ता यादी 5 जुलैला, तर द्विलक्षी विषयाची पहिली गुणवत्ता यादी 21 जूनला जाहीर होईल 

कालावधी : वेळ : तपशील 

 1. 13 ते 18 जून (सहा दिवस) : - द्विलक्षी (बायफोकल) विषयाचे ऑप्शन/ पसंतीक्रम भरणे. - कला, वाणिज्य, विज्ञान आणि एमसीव्हीसी शाखाचे अर्ज भरणे चालू - इनहाऊस, अल्पसंख्यांक, व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी महाविद्यालय स्तरावर प्रवेश अर्ज स्वीकारणे. - कोटा प्रवेशाची गुणवत्ता यादी महाविद्याल स्तरावरुन जाहीर करण्यात येईल. आणि वेळोवेळी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयातर्फे कोटा प्रवेश अपलोड करण्यात येतील. 
 2. 13 ते 25 जूनपर्यंत : सायंकाळी पाच वाजेपर्यंत : इतर सर्व शाखांचे (द्विलक्षी -बायफोकल वगळता) भाग एक आणि भाग दोन भरणे चालू राहिल. कोटा प्रवेश चालू राहतील. 
 3. 21 जून : सकाळी 11 वाजता : द्विलक्षी विषयाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर करणे. 
 4. 21 आणि 22 जून : सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत : द्विलक्षी विषयाच्या पहिल्या यादीतील ऑनलाईन प्रवेश देणे 
 5. 23 जून : सकाळी 11 वाजता : द्विलक्षी विषयाच्या दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा जाहीर करणे 
 6. 23 ते 25 जून (रविवार वगळून) : सकाळी 11 ते सायंकाळी पाच वाजता : द्विलक्षी विषयाचे दुसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रम भरणे 
 7.  25 जून : सायंकाळी पाच वाजता : सर्व शाखांचे भाग एक आणि भाग दोन भरणे बंद 
 8. 28 जून : सकाळी 11 वाजता : द्विलक्षी विषयाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर करणे. 
 9. 28 ते 29 जून : सकाळी 11 ते सायंकाळी पाच वाजता : द्विलक्षी विषयाचे दुसऱ्या यादीतील ऑनलाइन प्रवेश देणे 
 10. 29 जून : सायंकाळी पाच वाजता : सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करणे 
 11. 30 जून ते 2 जुलै : - : हरकती संबधित शिक्षण उपसंचालक कार्यालयात विहित नमुन्यात प्रत्यक्ष जमा करणे 
 12. 3 जुलै : सकाळी 11 वाजता : हरकतीनुसार निवारण करणे. 
 13. 5 जुलै : सकाळी 11 वाजता : पहिली नियमित गुणवत्ता यादी जाहीर 
 14. 6 ते 9 जुलै : सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजता : प्रथम नियमित गुणवत्ता यादीमधील प्रवेश देणे 
 15. 10 जुलै : सकाळी 11 वाजता : रिक्त जागांचा तपशील आणि पहिली फेरीचे कट ऑफ संकेतस्थळावर प्रसिद्ध 
 16. 10 ते 11 जुलै : सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजता : भाग एक आणि भाग दोन भरण्यासाठी उपलब्ध 
 17. 13 जुलै : दुपारी 4 वाजता : दुसरी नियमित गुणव्ता यादी जाहीर करणे 
 18. 14 ते 16 जुलै (रविवार वगळून) : सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजता : दुसऱ्या नियमित गुणवत्ता यादीतील प्रवेश 
 19. 17 जुलै : सकाळी 11 वाजता : रिक्त जागाचा तपशील जाहीर करणे 
 20. 20. - 18 ते 19 जुलै : सकाळी 11 ते 5 वाजता : भाग एक आणि भाग दोन भरणे सुरु 
 21. 23 जुलै : सकाळी 11 वाजता : तिसरी नियमित गुणवत्ता यादीमधील प्रवेश 
 22. 24 आणि 25 जुलै : सकाळी 11 ते सायं 5 वाजता : तिसऱ्या नियमित गुणवत्ता यादीमधील प्रवेश 
 23. 26 जुलै : सकाळी 11 वाजता : रिक्त जागा आणि तिसऱ्या यादीतील कट ऑफ जाहीर करणे 
 24. 26 आणि 27 जुलै : सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजता : भाग एक आणि भाग दोन भरणे 
 25.  29 जुलै : सकाळी 11 वाजता : चौथी नियमित गुणवत्ता यादी जाहीर 
 26. 30 ते 31 जुलै : सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजता : चौथी नियिमित गुणवत्ता यादीमधील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे 
 27. 1 ते 4 ऑगस्ट : - : नियमित चार फेऱ्यांमधून प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांमधून प्रवेश घेऊ इच्छित असणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता बायफोकलमधील द्विलक्षी (बायफोकल) विषयाच्या रिक्त जागासाठी महाविद्यालय स्तरावर अर्ज घेऊन आरक्षण आणि गुणवत्तेनुसार प्रवेश घेणे आणि ऑनलाइन अपलोड करणे.
Web Title: Timebtable for Mission Admission for Class XI in Maharashtra