Sasoon-Hospital
Sasoon-Hospitalsakal

ससून रुग्णालयात १६ वर्षांनंतर क्षयरोग विभागाला मिळाला वॉर्ड

ससून रुग्णालयात तब्बल १६ वर्षांनंतर क्षयरोगाच्या रुग्णांवर उपचारासाठी हक्काचा वॉर्ड मिळाला.
Summary

ससून रुग्णालयात तब्बल १६ वर्षांनंतर क्षयरोगाच्या रुग्णांवर उपचारासाठी हक्काचा वॉर्ड मिळाला.

पुणे - ससून रुग्णालयात (Sasoon Hospital) तब्बल १६ वर्षांनंतर क्षयरोगाच्या रुग्णांवर (Tuberculosis Patient) उपचारासाठी (Treatment) हक्काचा वॉर्ड (Ward) मिळाला. रुग्णालयाच्या आवारातील नवीन अकरा मजली इमारतीमध्ये नवव्या मजल्यावर हा वॉर्ड जुन्या इमारतीमधून स्थलांतरित करण्यात आला.

ससून रुग्णालयातील १८०० पैकी फक्त ७२ खाटा मिळविण्यासाठी एक-दोन नाही तर १६ वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. पण, ससून रुग्णालयाला क्षयरोगाची ‘अॅलर्जी’ असल्याप्रमाणे प्रशासनाचा कारभार सुरू असल्याचे निदान झाल्याचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले. त्यानंतर ससून रुग्णालयाच्या प्रशासकीय पातळीवर वेगाने हालचाली झाल्या आणि क्षयरोग विभागाला नवीन इमारतीमध्ये वॉर्ड देण्याचा निर्णय झाला. याचा ‘सकाळ’ने सातत्याने पाठपुरावा केला होता.

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे म्हणाले, ‘क्षयरोग विभागाच्या जागेवर ससून रुग्णालयाची नवीन इमारती उभारली होती. त्यामुळे या विभागाचे स्थलांतर पर्यायी जागेत केले होते. या विभागासाठी एकाच ठिकाणी ७० खाटांचा स्वतंत्र वॉर्ड मिळावा, ही मागणी होती. त्यामुळे नवीन इमारतीमध्ये त्यांना वॉर्ड देण्यात आला. त्यामुळे आता या विभागाकडून रुग्णसेवाचा दर्जा उंचावेल.'

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या श्वसनरोग विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. संजय गायकवाड यांनी ससून रुग्णालय प्रशासनाचे आभार मानले.

स्वतंत्र वॉर्डची गरज का?

  • क्षयरोग झालेल्या रुग्णावर योग्य उपचारांसाठी आणि त्यांची योग्य काळजी घेण्यासाठी सर्व सुविधांनी सुसज्ज स्वतंत्र वॉर्ड हवा.

  • क्षयरोगाच्या वॉर्डची रचना इतर सामान्य वॉर्डपेक्षा वेगळी असते. त्याचा संसर्ग नियंत्रित ठेवण्यासाठी ही व्यवस्था महत्त्वाची.

  • माणसाचा प्रत्येक श्वास सुरक्षित असला पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com