दुभाजकामुळे वाहतूक सुरळीत होणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 फेब्रुवारी 2017

कोथरूड - आशिष गार्डन चौकामध्ये रस्ता दुभाजकाचे काम पूर्ण झाल्याने वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून या चौकात वाहतुकीची समस्या भेडसावत होती. काही महिन्यांपूर्वी स्थानिक नागरिकांनी चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन केले होते.

आशिष गार्डन चौकाच्या परिसरात महेश विद्यालय, परांजपे विद्यालय, सिटी इंटरनॅशनल, अकलूज विद्यालय असल्याने विद्यार्थ्यांचीही मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. यामुळे चौकात अनेक छोटे-मोठे अपघात होतात. या घटना टळण्यासाठी रस्ता दुभाजक व सिग्नलची आवश्‍यकता होती. सध्या दुभाजकाचे काम पूर्ण होत असून, सिग्नलचेही काम लवकरच सुरू होणार आहे.

"चौकाच्या आजूबाजूला कुमार परिसर, महात्मा सोसायटी, सृष्टी सोसायट्या असल्याने या परिसरात सतत वाहतूक कोंडी होत होती. या कोंडीवरती सिग्नल व दुभाजक करणे हा एकमेव उपाय असल्याने त्याची आवश्‍यकता होती. दुभाजकाने वाहतूक कोंडी कमी होईल,'' असे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले.