वाहतूककोंडीमुळे एसटी बसेस वेळापत्रक कोलमडले

सुदाम बिडकर
गुरुवार, 19 एप्रिल 2018

पुणे शहरात येणाऱ्या नगर,सोलापूर,कोल्हापूर,
नाशिक महामार्गावर आज सायंकाळी वाहतूक कोंडी झाल्याने शहरात येणाऱ्या एसटी बसेस अर्धा ते एक तास उशीराने येत असल्याने एसटी बसेसचे वेळापत्रक कोलमडले. शिवाजीनगर बसस्थानकावरून सर्व मार्गावरील बसेस अर्धा ते पाऊण तास उशीराने सुटत होत्या.

पारगाव (पुणे) : पुणे शहरात येणाऱ्या नगर,सोलापूर,कोल्हापूर,
नाशिक महामार्गावर आज सायंकाळी वाहतूक कोंडी झाल्याने शहरात येणाऱ्या एसटी बसेस अर्धा ते एक तास उशीराने येत असल्याने एसटी बसेसचे वेळापत्रक कोलमडले. शिवाजीनगर बसस्थानकावरून सर्व मार्गावरील बसेस अर्धा ते पाऊण तास उशीराने सुटत होत्या.

सायंकाळी साडेसहा वाजता गर्दीची वेळ असतानाही सुमारे 15 मिनिटे एक ते सहा नंबरच्या फलाटावर एकही गाडी नव्हती. फलाट रिकामे होते. प्रवाशांची गैरसोय झाली होती. साध्या, हिरकणी, शिवनेरी व शिवशाही या सर्व गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले. सायंकाळची वेळ त्यातच सुट्यांचे दिवस त्यामुळे बसस्थानकामध्ये प्रवाशांची मोठया प्रमाणात गर्दी झाली. विशेष करून बाहेरगावी जाणाऱ्या महिला व ज्येष्ठ नागरिकांचे  प्रचंड हाल झाले.

रात्री पावणेआठच्या सुमारास तीच परिस्थिती होती. नाशिक महामार्गावरून येणाऱ्या नाशिक, शिर्डी व त्र्यंबकेश्वर शिवशाही गाड्या एक एक तास उशीराने शिवाजीनगर बसस्थानकात येत असल्याने बाहेरगावी जाणाऱ्या गाड्यांचे  पुढील सर्व वेळापत्रक कोलमडले.

Web Title: Traffic Jam ST Buses Time table have been collapsed