पोलिस चौकीसमोरच वाहतुकीचा बोजवारा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

पुणे - सेनादत्त पोलिस चौकीसमोर पोलिस हजर असूनही वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात होते. लाल दिवा लागूनही सिग्नल तोडून; तसेच झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे जाऊन वाहनचालक थांबत असल्याचे चित्र ‘रोटरी क्‍लब ऑफ पुणे मेट्रो’च्या सदस्यांना दिसून आले. 

पुणे - सेनादत्त पोलिस चौकीसमोर पोलिस हजर असूनही वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात होते. लाल दिवा लागूनही सिग्नल तोडून; तसेच झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे जाऊन वाहनचालक थांबत असल्याचे चित्र ‘रोटरी क्‍लब ऑफ पुणे मेट्रो’च्या सदस्यांना दिसून आले. 

‘रोटरी क्‍लब ऑफ पुणे मेट्रो’तर्फे बुधवारी सेनादत्त पोलिस चौकीसमोर वाहतूक अभियान राबविण्यात आले. तेथे पोलिस हजर असूनही काही वाहनचालक वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून सिग्नल तोडून पुढे जात होते. म्हात्रे पुलाकडून येणारी वाहने विशेषतः दुचाकी आणि रिक्षा रस्ता दुभाजकाच्या विरुद्ध दिशेने येऊन सिग्नलला उभी राहतात. तसेच, चुकीच्या दिशेने दांडेकर पुलाकडे वळतात. त्यामुळे पादचारी आणि इतर वाहनांसोबत अपघात होण्याची शक्‍यता असते. विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनचालकास रोटरीच्या सदस्यांनी थांबवून विचारले असता, त्या चालकाने अरेरावीची भाषा वापरून दुचाकी पुढे नेली. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांमध्ये पीएमपी बस, महापालिकेची अवजड वाहने आणि आलिशान मोटारींच्या चालकांचा समावेश होता.

या अभियानात ‘रोटरी क्‍लब ऑफ पुणे मेट्रो’चे अध्यक्ष शार्दूल गांधी, उपाध्यक्ष भावना चाहुरे, मुकुंद चिपळूणकर, उदय कुलकर्णी आणि दिलीप देशपांडे या वेळी उपस्थित होते.

सेनादत्त पोलिस चौकात उलट दिशेने वेगात येणाऱ्या वाहनांमुळे धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. पादचारी आणि नियमांचे पालन करणाऱ्या वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक पोलिसांनी कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.
- शार्दूल गांधी, अध्यक्ष, रोटरी क्‍लब ऑफ पुणे मेट्रो

पुणे

टाकवे बुद्रुक : कर्जमाफीच्या लाभार्थी शेतकऱ्यांची ऑनलाईन अर्ज भरायला सायबर कॅफेत रांग लागत आहे. ऑनलाईन अर्ज दाखल करायला...

03.57 PM

जुन्नर : शेतकरी कर्जमाफीचे अर्ज भरताना 'भीक नको पण कुत्रं आवर' असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असल्याचे कृषीनिष्ठ शेतकरी...

03.36 PM

औंध : औंधरस्ता येथील पडळवस्ती येथे शुक्रवारी रात्री लागलेल्या आगीत सतरा घरे जळून खाक झाल्याने सर्वच कुटूंबे उघड्यावर पडली आहेत...

12.45 PM