ट्रान्‍सफॉर्मर स्फोटाची मंत्र्यांकडून दखल

Transformer-Blast
Transformer-Blast

पुणे - खराडी येथील ट्रान्स्फॉर्मर स्फोटाचे प्रकरण दडपण्यासाठी दिलेल्या खोट्या अहवालाची उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करावी. तसेच या घटनेत मरण पावलेल्या प्रियंका झगडे आणि पंकज खुने या दोघांच्या कुटुंबीयांना अर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आमदार विजय काळे यांनी मंगळवारी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटून केली. 

या संदर्भात लवकरच बैठक बोलावून दोघांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यासंदर्भात निर्णय घेऊ व दोषींवर कारवाई करू, असे आश्‍वासन बावनकुळे यांनी दिले.

खराडी येथील झेन्सॉर कंपनीसमोरील पदपथावरील ट्रान्स्फॉर्मरचा स्फोट झाला होता. त्यामध्ये गंभीर भाजल्याने अभियंता प्रियंका झगडे आणि पंकज खुने यांचा मृत्यू झाला होता.  या संदर्भात पोलिसांनी केलेल्या चौकशीत विद्युत निरीक्षकांनी दिलेला अहवाल खोटा असल्याचे समोर आले होते. या बाबतचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन आमदार काळे यांनी ऊर्जामंत्र्यांना भेटून मागण्यासंदर्भातील निवेदन दिले.

वास्तविक महावितरणाचा यामध्ये दोष असल्यामुळे सबंधितांच्या कुटुंबीयांना आर्थिक भरपाई मिळावी. तसेच हे प्रकरण दडपण्यासाठी खोटा अहवाल देणाऱ्या विद्युत निरीक्षकावर कारवाई करावी, अशी मागणी ऊर्जामंत्र्यांना भेटून केली.
- विजय काळे, आमदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com