वेश्‍याव्यवसायातून दोन मुलींची सुटका

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 एप्रिल 2018

पुणे - उत्तर प्रदेश व कन्याकुमारी येथील दोन अल्पवयीन मुलींना जबरदस्तीने वेश्‍याव्यवसाय करायला लावणाऱ्या कुंटणखाना मालकिनीसह एकास सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून मुलींची सुटका करण्यात आली.

याप्रकरणी कुंटणखाना मालकीण पद्मा ऊर्फ कमला कल्पेश जैन (वय ३५, रा. बुधवार पेठ, मूळ नेपाळ) हिच्यासह दिनेश मोहन यादव (वय ३६, रा. गोपीनाथनगर, श्रीरामपूर, नगर) यांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलिस निरीक्षक संजय पाटील यांना यादव याने अल्पवयीन मुलीस पळवून आणून तिच्याकडून बुधवार पेठेतील एका कुंटणखान्यामध्ये जबरदस्तीने वेश्‍याव्यवसाय करायला लावला जात असल्याची माहिती एका स्वयंसेवी संस्थेने दिली. त्यानुसार, तक्रारीची पडताळणी केल्यानंतर पाटील यांच्यासह चंद्रकांत जाधव, शीतल भालेकर, नितीन तरटे, रमेश लोहकरे आदींच्या पथकाने संबंधित कुंटणखान्यावर छापा घातला. त्यामध्ये संबंधित मुलीसह आणखी एक अल्पवयीन मुलगी तेथे आढळून आली. दोघींची सुटका करण्यात आली. त्यानंतर कमला व दिनेश या दोघांना अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक केली.

Web Title: two girl release in prostitution business