पुण्यात 'राँग साईड'ने आलात, तर टायरच होणार पंक्चर!

पुण्यात 'राँग साईड'ने आलात, तर टायरच होणार पंक्चर!

पुणे : अॅमनोरा टाउनशिपमध्ये 'नो एन्ट्री'तून येणा-या वाहनांसाठी टायर किलर यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्यामुळे जर वाहन एंट्री असलेल्या दिशेने गेले तर या यंत्रणेला बसवलेले चार इंची धारदार लोखंडी काटयांची स्प्रिंग खाली दबते. यावेळी टायर किलर स्पीडब्रेकरचे काम करतो. मात्र 'नो एन्ट्री'तून जर वाहन आले तर वाहनाचा संपूर्ण टायर मध्ये हे चार इंची लोंखडी काटे घुसतात व टायर 'बर्स्ट' होतो. तसेच वाहनदेखील पुढे घेवून जाता येत नाही. त्यामुळे येथील बेशिस्त वाहनचालकांवर चांगलाच अंकूश बसला आहे.

या भागात अॅमानोरा पिअर्सन स्कूल आहे. अनेक सोसायट्यांमधूनही नागरिक बेशिस्तीने येत होते. त्यामुळे अपघाताचा धोका होता. यावर उपाय म्हणून प्रशासनाने जनजागृतीही केली; पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. 

अखेर प्रशासनाने येथे 'टायर किलर' यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला. गेल्या महिन्यापासून ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्याने पुढील काळात पुणे शहरात अन्यत्रही आवश्यक त्या ठिकाणी ही यंत्रणा बसविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

'सिटी कॉर्पोरेशन'चे उपाध्यक्ष सुनील तरटे म्हणाले, "ही यंत्रणा बसविण्यात आल्याने या भागात वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली आहे. तसेच, या यंत्रणेबाबत पुणे शहर वाहतूक विभागाच्या वतीनेही दखल घेण्यात आली आहे. शहरात इतर ठिकाणीही अशी यंत्रणा बसविण्यात येऊ शकते का, याबाबत वाहतूक विभागाच्या उपायुक्तांनी माझ्याकडून माहिती मागविली आहे. टायर किलर यंत्रणेमुळे वाहतुकीला शिस्त लागण्यास मदत झाली आहे.''

नागरिक निलेश देशमुख म्हणाले, टायर किलर यंत्रणा हि यंत्रणा बसविल्यापासून येथील वाहतूक कोंडी कमी झाली. नोएंट्रीतून येणा-या वाहनांना लगाम बसला. अपघाताचा धोका देखील कमी झाला आहे. हि यंत्रणा बसविल्यानंतर नागरिकांची जनजागृती देखील करण्यात आली असल्याने नागरिक देखील वाहतूकीचे नियम पाळत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com