केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान येत्या शनिवारी पुण्यात

‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०- ट्रान्सफॉर्मिंग व्हीजन इनटू प्रॅक्टिस’ विषयावर आयोजित परिषदेत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे अध्यक्ष पद भूषविणार आहेत.
dharmendra pradhan
dharmendra pradhansakal
Summary

‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०- ट्रान्सफॉर्मिंग व्हीजन इनटू प्रॅक्टिस’ विषयावर आयोजित परिषदेत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे अध्यक्ष पद भूषविणार आहेत.

पुणे - सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठातर्फे येत्या शनिवारी (ता. २८) ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०- ट्रान्सफॉर्मिंग व्हीजन इनटू प्रॅक्टिस’ विषयावर आयोजित परिषदेत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे अध्यक्ष पद भूषविणार आहेत. ही परिषद विद्यापीठाच्या लवळे येथील कॅम्पसमध्ये सकाळी अकरा ते दुपारी दीड या वेळेत आयोजित करण्यात आली आहे.

परिषदेतील व्याख्यानानंतर प्रधान हे ‘फॅकल्टी ट्रान्सफॉर्मेशन’ विषयावर प्राध्यापकांना देखील संबोधित करणार आहेत. यावेळी ‘सिंबायोसिस’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच या परिषदेत नामवंत शिक्षणतज्ञ, विद्यापीठातील अधिकारी, कुलगुरू, संचालक, प्राचार्य आणि विविध विद्यापीठे, महाविद्यालये आणि संस्थांमधील प्राध्यापक सहभागी होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com