सरकार लोकांना पिझ्झा देणार काय - पवार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 नोव्हेंबर 2017

वरवंड - ‘‘सरकारचे दाखवायचे दात वेगळे अन्‌ खायचे वेगळे आहेत. सरकारच्या शेतीविरोधी धोरणामुळे शेतकरी अडचणीत आहे. शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. शेतकऱ्याने नाही पिकवले; तर सरकार लोकांना काय पिझ्झा खायला घालणार काय?’’ असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

कानगाव (ता. दौंड) येथील शेतकऱ्यांनी दोन नोव्हेंबरपासून पुकारलेल्या राज्यव्यापी शेतकरी आक्रोश आंदोलनास पवार यांनी शनिवारी (ता. ११) दुपारी दोन वाजता अचानक भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. 

आंदोलनातील शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त आहेत. आंदोलन करणे त्यांचा अधिकार आहे. सरकारने सकारात्मक तोडगा काढण्यासाठी पुढे तर आले पाहिजे, असे पवार म्हणाले.