वाहन चोरणारी टोळी गजाआड 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जानेवारी 2017

पुणे - पुण्यासह इतर शहरांतून नवी वाहने चोरणाऱ्या टोळीतील चार गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून 37 दुचाकी आणि तीन मोटारी जप्त केल्या आहेत. या टोळीत इयत्ता बारावी आणि बीई मेकॅनिकलचे शिक्षण घेणाऱ्या दोघांचा समावेश आहे. 

अशोक रामनाथ हिंगे (वय 22, रा. मुंगसेवाडी, जि. नगर), सुमीत गणेश असवले (वय 21, रा. वारजे माळवाडी), महेश नारायण राऊत (वय 22, रा. वरकुटे बुद्रुक, ता. इंदापूर) आणि धीरज सुरेश लोखंडे (वय 20, रा. भंडीशेगाव, जि. सोलापूर) अशी आरोपींची नावे आहेत. 

गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्‍त पी. आर. पाटील आणि सहायक आयुक्‍त सुरेश भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमीत हा येथील एका महाविद्यालयात बारावीत शिकत आहे, तर महेश हा इंदापूरच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये बीई मेकॅनिकल पदवीच्या अंतिम वर्षात आहे. आरोपींनी वारजे माळवाडी, सिंहगड रस्ता, चंदननगर, लोणीकंद, सासवड, नगर, शिरूर कासार, सातारा, फलटण आणि पंढरपूर येथून वाहनांची चोरी केल्याची कबुली दिली. त्यात तीन स्कॉर्पिओ, सात बुलेटसह सुमारे 50 लाख रुपये किमतीच्या वाहनांचा समावेश आहे. युनिट तीनचे वरिष्ठ निरीक्षक सीताराम मोरे, सहायक निरीक्षक रवींद्र बाबर, उपनिरीक्षक प्रकाश अवघडे, संदीप तळेकर, अतुल साठे, कल्पेश बनसोडे, रोहिदास लवांडे आदींनी ही कारवाई केली. 

अशी करत होते चोरी 
ही टोळी रात्री हॅंडल लॉक तोडून दुचाकींची चोरी करत असत. त्यानंतर जुन्या आरसी बुकच्या झेरॉक्‍सच्या आधारे नवीन आरसी बुक तयार करून त्यांची विक्री करत. तसेच स्कॉर्पिओचा मागचा दरवाजा स्क्रू ड्राव्हरने उघडून स्टेअरिंग लॉक तोडून मोटार चोरी करत होते. 

अशी मिळाली माहिती 
अशोक हिंगे याला वडिलांच्या यकृताच्या ऑपरेशनसाठी पैशांची गरज होती. त्यामुळे तो वाहने चोरी करत होता. खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, तो पहिल्यांदा पोलिसांच्या हाती लागला. चौकशीदरम्यान त्याने अन्य आरोपींबाबत माहिती दिली. 

Web Title: Vehicle thieves gang arrested