वाकडमध्ये रद्दीचा टेम्पो जळून खाक

wakad fire
wakad fire

पिंपरी (पुणे) - उभ्या असलेल्या रद्दीच्या टेम्पोला आग लागून जळून खाक झाला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास वाकड येथे घडली.

अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साई चौक, वाकड येथील युनिक स्कूलजवळ उभ्या असलेल्या रद्दीच्या टेम्पोला (एमएच-14-सीडी-7332) आग लागल्याची माहिती अर्चित नावाच्या व्यक्‍तीने आणि वाकड पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक जाधव यांनी 1.23 वाजता अग्निशामक दलास दिली. त्यानुसार रहाटणी आणि संत तुकाराम नगर येथील अग्निशामक मुख्यालयातून प्रत्येकी एक बंब रवाना केला. टेम्पो रद्दीने भरला असल्याने आग आटोक्‍यात येत नव्हती. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी टेम्पोतील रद्दी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. अर्धा तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. मात्र तोपर्यंत टेम्पो जळून खाक झाला होता.

टेम्पोवर आशापुरी रद्दी नाव लिहिले होते. टेम्पोवर दोन मोबाईल क्रमांकही लिहिले होते. या क्रमांकावर पोलिस आणि अग्निशामक दलाने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र वारंवार संपर्काचा प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही. आगीचे कारण देखील समजू शकले नाही. मात्र शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com