प्रभागांच्या जाहीरनाम्यांचे प्रकाशन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 फेब्रुवारी 2017

पुणे :  शहरातील प्रत्येक प्रभागाच्या नागरी सुविधांच्या गरजेनुसार भारतीय जनता पक्षाने तयार केलेल्या 41 प्रभागांच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन पक्षाचे उपाध्यक्ष आणि खासदार विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते बुधवारी झाले. राज्यातील नागरी जीवनात परिवर्तन करणारे हे एक पाऊल असल्याचे प्रतिपादन त्यांनी या प्रसंगी केले. या वेळी शहराध्यक्ष योगेश गोगावले, खासदार अनिल शिरोळे, आमदार मेधा कुलकर्णी उपस्थित होत्या. 

पक्षाने संपूर्ण शहरासाठीचा जाहीरनामा नुकताच प्रसिद्ध केला आहे. पाठोपाठ आता प्रभागनिहाय जाहीरनामे तयार केले आहेत. आगामी काळात या जाहीरनाम्यांनुसार शहराचा विकास करण्यासाठी पक्ष आग्रही राहणार असल्याचेही सहस्रबुद्धे यांनी सांगितले. लोकसहभाग, कल्पकतेवर आधारित प्रश्‍नांची सोडवणूक आणि विकास, हे या जाहीरनाम्यांचे वैशिष्ट्य आहे. देशात 68 महापालिकांत भाजपची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे अनेक विकासकामे मार्गी लागली असून, त्याची पुनरावृत्ती येथे होणार आहे. 
गोगावले म्हणाले, ""निवडून आलेल्या नगरसेवकांनी एका सूत्रामधून काम करावे, या मूळ संकल्पनेतून प्रभागनिहाय जाहीरनामे तयार केले आहेत. हे जाहीरनामे प्रत्येक प्रभागात किमान 15 हजार घरांपर्यंत गुरुवारी (ता. 16) पोचविण्यात येणार आहेत.'' खजिनदार विनायक आंबेकर यांनी प्रास्ताविक केले. 

भाजपतर्फे आज महिला पदयात्रा 
भारतीय जनता पक्षातर्फे संपूर्ण शहरात गुरुवारी सायंकाळी 4 ते 7 दरम्यान प्रत्येक प्रभागातून महिलांची पदयात्रा काढण्यात येणार आहे. उमेदवारांचाही त्यात समावेश असेल. महिला मतदारांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी याचे आयोजन केले आहे, असे योगेश गोगावले यांनी सांगितले.