नवी सांगवीत प्लॅस्टिक बंदीची वारी

मिलिंद संधान
शनिवार, 14 जुलै 2018

नवी सांगवी (पुणे) : जनता शिक्षण संस्था संचालित येथील ब्लाॅसम इंग्लिश मिडियम पूर्व प्राथमिक, प्राथमिक व एसजेएच गुरुनानक हायस्कूल यांच्या वतीने आज शनिवारी (ता. 14) 'प्लॅस्टिक मुक्ती' ची वारी काढण्यात आली. 

नवी सांगवी (पुणे) : जनता शिक्षण संस्था संचालित येथील ब्लाॅसम इंग्लिश मिडियम पूर्व प्राथमिक, प्राथमिक व एसजेएच गुरुनानक हायस्कूल यांच्या वतीने आज शनिवारी (ता. 14) 'प्लॅस्टिक मुक्ती' ची वारी काढण्यात आली. 

आजच्या काळात प्लॅस्टिकचा वाढलेला वापर व भविष्यातील समस्या याविषयी विद्यार्थ्यांमध्ये व समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी प्रशालेच्या वतीने या वारीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थीनी पारंपरिक वेशभूषा परिधान केला होता. वारीचा मार्ग साई चौक, कृष्णा चौक, फेमस चौकात हे बाल वारकरी ' प्लास्टिक टाळा पर्यावरण वाचवा... या सारख्या घोषवाक्याचा गजर करीत होते. तसेच विद्यार्थ्यांनी प्लॅस्टिक मुक्ती या विषया वर विविध  पोस्टर व भित्तीचित्र  तयार करुन लोकांना दाखवित होते. तसेच यावेळी स्वतः तयार केलेल्या कागदी पिशव्यांचे वाटपही करत होते. 

प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका वृषाली पलांडे यांनी मागील प्लॅस्टिकचे तोटे यावर माहिती  सांगितली. तर माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका बादशाह तबस्सूम यांनी आपली शाळा प्लॅस्टिकमुक्त शाळा करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन  केले. 

अशा आगळ्या वेगळ्या शाळेतील वारीने विद्यार्थ्यांच्या चेहरा भक्तीमय वातावरणात  न्हाऊन  निघाला होता. कार्यक्रमाचे नियोजन प्रियंका लोमटे, सागर झगडे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी केले.

Web Title: wari for plastic ban in sangavi