शहर कचराडेपो मुक्त करण्याच्या दिशेने बारामतीकरांचे एक पाऊल

मिलिंद संगई
मंगळवार, 22 मे 2018

बारामती (पुणे) : शहर कचरा डेपो मुक्त करण्याच्या दिशेने बारामती शहरात एक पाऊल पुढे टाकण्यात आले आहे. शहरातील श्री छत्रपती शाहू हायस्कूल, आर.एन. आगरवाल टेक्निकल हायस्कूल तसेच धों.आ. सातव हायस्कूलमध्ये कचरा खाणाऱ्या टोपलीचा वापर सुरु करण्याचा निर्णय झाला आहे.

एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून सुनेत्रा पवार यांनी या उपक्रमाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा निर्धार केला असल्याची माहिती नगरपालिकेचे गटनेते सचिन सातव यांनी दिली.

बारामतीतील प्रशांत भोसले यांनी कचरा खाणारी टोपली विकसीत केलेली असून बांबू पासून ही टोपली तयार करण्यात आली आहे. टोपली तयार करतानाच त्यात जिवाणूंचे विरजण असते त्या मुळे ही टोपली कचरा टाकल्यावरही दुर्गंधी देत नाही. या मध्ये ओला कचरा टाकायचा असून सुका कुचरा वेगळा गोळा करायचा आहे. हा कचरा यात टाकल्यानंतर काही दिवसानंतर आपोआप याचे खत तयार होते, याची दुर्गंधीही येत नाही किंवा इतर काही दुष्परिणाम होत नाही. घरात तयार होणारा ओला कचरा हा घरातच साठवून ठेवत खतनिर्मिती करायची, जेणेकरुन कचरा डेपोपर्यंत जाणारा हा कचरा आपोआपच रोखला जाईल अशी या मागील संकल्पना असल्याचे प्रशांत भोसले यांनी सांगितले.

या तिन्ही शाळेत प्रशांत भोसले यांनी विद्यार्थी व शिक्षकांना या बाबत मार्गदर्शन केले. या तिन्ही शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थीही कचरा खाणारी टोपली वापरुन खतनिर्मिती करणार आहेत.

हजार कुटुंबापासून प्रारंभ
पहिल्या टप्प्यात हजार कुटुंबातून कचरा डेपो पर्यंत जाणारा कचरा रोखण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. टप्याटप्याने बारामती शहरात हा प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्याचा प्रयत्न आहे. कचरा डेपो मुक्त बारामतीच्या दिशेने हा प्रयत्न आहे.
- सचिन सातव, गटनेते, बानप.

नगरपालिकेच्या माध्यमातून प्रयत्न करणार
दरम्यान माझ्या घरापासून कचरा खाणा-या टोपलीचा प्रारंभ केला आहे. कचरा डेपो पर्यंत कचरा न गेल्यास खतनिर्मिती तर होईलच शिवाय कच-याच्या समस्येवर मात करता येईल असा विश्वास वाटतो.
- पौर्णिमा तावरे, नगराध्यक्षा, बानप.

काय टाकू शकता टोपलीमध्ये
-    खरकटे अन्नपदार्थ
-    भाजीपाल्याचा कचरा किंवा देठे
-    शिळे अन्न
-    देवाला वाहिलेले निर्माल्य

Web Title: waste depot free baramati takes step for that