वॉटर गन, टॅंक, मॅजिक फुगे अन्‌ ताशाला पसंती 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

पुणे - फाल्गुन शुद्ध पौर्णिमा... अर्थातच होळी पौर्णिमा... पुरणाची पोळी आणि होळी... हे जुळलेलं समीकरण... त्यातच डमरू, टिमकी वाजवीत मनसोक्त आनंद लुटणाऱ्या बालगोपाळांच्या आनंदात भर पडते ती रंगीबेरंगी पिचकारी आणि पाण्याच्या फुग्यांची. यंदाही बाजारात चायनीज बनावटीच्या प्लॅस्टिकच्या विविध आकारांतल्या वॉटर गन, टॅंक आणि मॅजिक फुगे आले आहेत. तर चामड्याच्या टिमकीची जागा फायबरच्या ताशाने घेतली आहे. 

येत्या रविवारी (ता. 12) होळी पौर्णिमा आहे. बदलत्या काळानुसार टिमकी, डमरू, डफली, खंजेरी, बंदूक यांसारख्या विविध वस्तूंनी बाजारपेठ सजली आहे. वॉटर गन असो की टॅंक त्यामध्येही तीनशे-चारशेंहून अधिक प्रकार आले आहेत. पाच ते पाचशे रुपयांपर्यंत वॉटर गन असून 75 ते 800 रुपयांपर्यंत टॅंकच्या किमती आहेत. हे टॅंक पाठीवर अडकवून पंपांने रंग उडविता येतात. त्यामुळे त्याला अधिक मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. 

विक्रेते पुखराज जारोली म्हणाले, ""मॅजिक फुगे यंदाचे आकर्षण आहे. विविध वस्तूंवर कार्टून कॅरॅक्‍टर, बार्बी, छोटा भीम, एव्हेंजर, स्पायडर मॅन, डोरेमोन यांसारखी चित्रेही छापली आहेत. फळांपासून बनविलेले रंगही आले आहेत.'' 

संगीता काळभोर म्हणाल्या, ""चामड्यापेक्षा फायबरच्या टिमक्‍या (ताशा) वजनाला हलक्‍या असतात. त्यामुळे लहानमुलांसाठी ग्राहक फायबरच्या टिमक्‍याच खरेदी करतात. होळीसाठी एरंडाचे पान, उसाचे वाड आणि टिमकी ही हमखास असतेच.'' 

Web Title: Water guns, magic bubbles holi

टॅग्स