चिखलीत आठ दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

चिखली - चिखली परिसरात आठ दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून, नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. संतप्त महिलांनी नगरसेवक दत्ता साने यांच्याकडे ही समस्या मांडली. याबाबत साने यांनी महापालिका अधिकाऱ्यांना बोलावून जाब विचारला. आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास पालिकेवर महिलांचा मोर्चा काढून टाळे ठोकण्यात येईल, असा इशाराही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. 

चिखली परिसरातील मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती तसेच गावठाणातील रामदासनगर आदी परिसरात गेल्या आठ दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. सखल भागातील नळजोडांना पाणी येत असले तरी, ते अतिशय कमी दाबाने येते. हंडा भरण्यासाठी अर्धा तास लागतो. गुरुवारी श्रीराम सोसायटी, साने कॉलनी, सिंहगड, शिवपार्वती, राजगड पार्क १ आणि २, गणेश कॉलनी आदी सोसायट्यांमधील नागरिकांना पाणी मिळाले नाही. त्यामुळे संतप्त महिलांनी नगरसेवक साने यांचे कार्यालय गाठून पाण्याची मागणी केली. साने यांनी महापालिका अधिकाऱ्यांना बोलावून, त्यांची कानउघाडणी केली. तसेच आठ दिवसांत संपूर्ण चिखली परिसराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या. अन्यथा महापालिकेवर महिलांचा मोर्चा काढून पालिकेला टाळे ठोकू, असा इशारा दिला.

पाणीपुरवठा त्वरित सुरळीत करण्याचे आश्‍वासन पालिका अधिकाऱ्यांनी नागरिकांना दिले.

Web Title: water supply low pressure in chikhali