विणकामाने केलेला स्‍कार्फ; लांबी पाच किलोमीटर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

पुणे - ‘‘तुमची विणकामाची कला स्वतःपुरती मर्यादित न ठेवता तिचा उपयोग तुम्ही लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, कर्करोगाचे रुग्ण आणि गरजू व्यक्तींसाठी करीत आहात. हे कौतुकास्पद आहे,’’ असे मत महापौर मुक्ता टिळक यांनी व्यक्त केले. 

पुणे - ‘‘तुमची विणकामाची कला स्वतःपुरती मर्यादित न ठेवता तिचा उपयोग तुम्ही लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, कर्करोगाचे रुग्ण आणि गरजू व्यक्तींसाठी करीत आहात. हे कौतुकास्पद आहे,’’ असे मत महापौर मुक्ता टिळक यांनी व्यक्त केले. 

‘मदर इंडियाज क्रॉशेट क्वीन्स (एमआयसीक्‍यू)’तर्फे विणकामातून तयार केलेल्या पाच किलोमीटर लांबीच्या स्कार्फची नोंद गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये २५ मे २०१७ रोजी चेन्नई येथे होणाऱ्या कार्यक्रमात होणार आहे. या त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. हा आगळा-वेगळा स्कार्फ ४५ महिलांनी तयार केला आहे. महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष विशाल चोरडिया, मनोज देशपांडे, अविनाश शिळीमकर, नगरसेवक सुनील कांबळे, नगरसेविका राजश्री शिळीमकर, विनोद ओस्तवाल उपस्थित होते.

टिळक म्हणाल्या, ‘‘या उपक्रमातून नवीन पिढीलाही एक चांगला संदेश मिळणार आहे. कुठलीही महिला आणि तिच्या चांगल्या कामाला आपण प्रोत्साहन दिले पाहिजे.’’

चोरडिया म्हणाले, ‘‘वयाची मर्यादा न ठेवता आजच्या तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून नवीन संघटनात्मक कार्य आणि उपक्रम कसा करता येऊ शकतो, याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.’’ यापूर्वी या संस्थेच्या महिलांनी २००६ मध्ये सर्वांत मोठे ब्लॅंकेट विणण्याचा रेकॉर्ड केला आहे. संस्थेच्या संस्थापिका सुबश्री नटराजन, संस्थेच्या पुणे समन्वयक मीनाक्षी गणेश, संगीता लुणावत, आदिती वळसंगकार, अमृता बर्वे, राणी संजीवनकुमार, प्राची बाग, रेवती वरदराजन, अँड्रिया सलढाणा यासह पुण्यातील ४५ महिला उपक्रमात सहभागी झाल्या होत्या. 

Web Title: Weaving a scarf