शेतकऱ्यांना २४ तास वीज कधी मिळणार - श्रीरंग बारणे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 एप्रिल 2017

पिंपरी - देशातील शहरी भागामध्ये २४ तास वीजपुरवठा उपलब्ध असतो; परंतु ग्रामीण भागामधील शेतकऱ्यांना लोडशेडिंगचा सामना करावा लागतो आणि रात्र रात्र जागून शेतीला पाणी द्यावे लागते. ही देशभरातील शेतकऱ्यांची व्यथा खासदार श्रीरंग बारणे यांनी तारांकित प्रश्‍नाद्वारे लोकसभेत मांडली. 

खासदार बारणे म्हणाले, की सध्याचे सरकार सत्तेवर आल्यानंतर कोळशापासून व अन्य वीजनिर्मितीच्या मार्गाने देशातील विजेचे उत्पन्न वाढल्याचे एकंदर अहवालावरून तरी दिसते. राज्यातील वीजवाटप हा जरी राज्य सरकारच्या अखत्यारीतला प्रश्‍न असला, तरी देखील शेतकऱ्यांना २४ तास वीज कधी मिळणार, असा तारांकित प्रश्न बारणे यांनी विचारला. 

केंद्रीय कोळसा खाण व ऊर्जा मंत्री पियुष गोयल म्हणाले, विजेचे उत्पन्न मागील सरकारच्या तुलनेने वाढले आहे. देशभरातील शेतकऱ्यांना २४ तास वीज पुरवठा व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. राज्यातील विजेवरील पूर्ण नियंत्रण हे जरी राज्य सरकारचे असले तरीदेखील केंद्राच्या माध्यमातून तशा प्रकारच्या सूचना देण्यात येतील असे या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री म्हणाल्याचे बारणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.