पंचतारांकित सुविधांमुळे गहुंजे स्टेडियम जगप्रसिद्ध 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

पुणे - गहुंजे येथील स्टेडियम बांधताना दोन वर्षे केवळ डिझाइनवर गेले; पण अवघ्या 18 महिन्यांमध्ये त्याचे बांधकाम पूर्ण झाले. जवळपास 40 हजार प्रेक्षकांना क्रिकेटचा आनंद लुटता यावा, यासाठी शास्त्रीय पद्धतीची बहुमजली बैठक व्यवस्था, वातानुकूलित चेंबर्स, प्रकाश योजना, पार्किंग व्यवस्था, अग्निशमन योजना, आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुसज्ज कॅमेरे, स्क्रीन्स, मध्यवर्ती नियंत्रण कक्षाची व्यवस्था अशा पंचतारांकित सुविधांमुळे हे स्टेडियम जगात प्रसिद्ध झाले आहे. प्रेक्षकांसह जागतिक खेळाडूंचा प्रतिसाद पाहून समाधान वाटते, असे मत आंतरराष्ट्रीय वास्तुविशारद दर्शन मेढी यांनी व्यक्त केले. 

घोले रोड येथील पंडित जवाहरलाल नेहरू प्रेक्षागृह येथे "वाइड अँगल' संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. अभय आपटे, प्रिया गोखले उपस्थित होते. 

मेढी म्हणाले, ""कोणत्याही स्टेडियमचे डिझाइन केवळ खेळाडूंच्या सुविधेसाठी केले जात नाही, तर प्रेक्षकांनाही सुसह्य वाटले पाहिजे. गहुंजे येथील एमसीए क्रिकेट स्टेडियमच्या बांधकामासाठी जागतिक दर्जाचे स्टील, फॅब्रिक कोटेड छत वापरले आहे. स्टेडियममध्ये कोणत्याही दिशेला बसून क्रिकेटचा आनंद घेता येतो. लोकांच्या प्रतिक्रियेसह जागतिक खेळाडूंची प्रतिक्रिया मिळते, तेव्हा केलेल्या कामाचे समाधान वाटते. सध्या देशातील सर्वांत मोठे व सर्व सुविधायुक्त नवीन मोटेरा स्टेडियमचे बांधकाम अहमदाबाद येथे सुरू असून, ते अंतिम टप्प्यात आहे.'' 

ऍड. आपटे म्हणाले, ""क्रिकेट हा जरी इंग्रजी लोकांचा खेळ म्हणून ओळख असली तरी हेडक्वार्टर भारतात झाले आहे. सरकारी संथ कामकाज, विविध कायद्याच्या कचाट्यातून जागतिक दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारता आले याचे समाधान आहे.''