विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

राजकुमार शहा
शुक्रवार, 25 मे 2018

मोहोळ : विद्युत मोटार दुरुस्त करावयास गेलेल्या एका 32 वर्षीय तरूण शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना भोयरे ता. मोहोळ येथे शुक्रवारी दुपारी बारा वाजता घडली. नवनाथ लक्ष्मण शिरसट (रा. भोयरे) असे मृताचे नाव आहे. 

मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भोयरे येथील मल्हारी माळी यांची शेती नदीच्या कडेला आहे. त्याठिकाणी त्यांची विद्युत मोटार आहे. मोटार बंद पडली म्हणून मल्हारी यांचा मुलगा व मृत नवनाथ हे दोघे ती दुरुस्त करावयास गेले होते. मोटारची वायर बसविताना नवनाथला अचानक विद्युत शॉक लागला व तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने  उपचारासाठी मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरानी नवनाथला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मल्हारी तुकाराम माळी यांनी मोहोळ पोलिसांना दिली असून पुढील तपास हवालदार राठोड करीत आहेत.

Web Title: A young died due to electricity shock

टॅग्स