साकोरीत तरुणांची आगळीवेगळी शर्यत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

महाळुंगे पडवळ - साकोरे (ता. आंबेगाव) येथील पंचरत्न गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हसोबा महाराज उत्सवानिमित्त तरुणांच्या शर्यतीचे आयोजन केले होते. चार तरुण एकमेकांच्या हातांना धरून बैलगाड्याप्रमाणे घाटातून धावले. या आगळ्यावेगळ्या शर्यतीची परिसरात रंगतदार चर्चा सुरू आहे.

बैलगाडा शर्यतीवर गेल्या तीन वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयाची बंदी आहे. बैलगाडे सुरू होण्यासाठी अनेकदा बैलगाडा मालकांनी व प्रेक्षकांनी आंदोलने केली; परंतु बैलगाडा शर्यत सुरू होण्यासाठी राज्य व केंद्र सरकार फारसे उत्सुक नाहीत. बैलगाडा शर्यतीविना तालुक्‍यातील अनेक देवांचे उत्सव पार पडले आहेत. उत्सवामध्ये गर्दी होत नसल्याने छोट्या- मोठ्या व्यावसायिकांवर परिणाम झाला आहे. पंचरत्न गणेश मंडळाचे अध्यक्ष नितीन लोहोटे, साकोरे ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय मोढवे, संतोष लोहोटे, जयसिंग लोहोटे, अनिल लोहोटे, नारायण लोहोटे, अभिजित तोत्रे, रमेश तोत्रे आदी तरुणांनी बैलांऐवजी तरुणांचे गाडे पळविण्याचे नियोजन केले. कृत्रिम घाट तयार करण्यात आला होता.

निषेध म्हणून वेगळी शर्यत - लोहोटे
पंचरत्न गणेश मंडळाचे खजिनदार गणेश लोहोटे म्हणाले, ‘‘केंद्र व राज्य सरकार बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याबाबत योग्य तो निर्णय घेत नाहीत. या गोष्टीचा निषेध म्हणून म्हसोबा महाराज उत्सवानिमित्त तरुणांचे गाडे पळविण्यात आले आहेत. एकूण २५ तरुणांचे गाडे शेतात तयार करण्यात आलेल्या घाटातून धावले आहेत.’’

Web Title: youth competition