झाकीरच्या खात्यावर विदेशातून 60 कोटी रुपये

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 ऑगस्ट 2016

मुंबई- इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचा संस्थापक आणि वादग्रस्त धर्मगुरू डॉ. झाकीर नाईक याच्या बँक खात्यात परदेशातून मागील तीन वर्षांत तब्बल 60 कोटी रुपये एवढी रक्कम जमा करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या तपासात ही माहिती उघड झाली आहे. 

तीन वेगवेगळ्या देशांतून नाईकच्या कुटुंबातील सदस्यांच्या पाच वेगळ्या खात्यांवर पैसे जमा करण्यात आल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. 

पोलिस सूत्रांनी सांगितले की, त्यांनी झाकीरच्या आर्थिक देवाणघेवाणीच्या दृष्टीने तपास केला आणि त्याच्या व्यवहाराचा सर्व तपशील मिळाला. 

"आम्हाला आमच्या अद्याप हे लक्षात आले नाही की हे पैसे नेमके कशासाठी पाठविण्यात आले होते. आम्ही चौकशी केली असून, पैशाचा स्त्रोत मिळाला आहे. त्याच्या कुटुंबीयांच्या खात्यांवर पैसे जमा करण्यात आले होते," असे पोलिसांनी सांगितले.