...पाऊस कोसळू लागतो जेव्हा। ढिंग टांग)

British Nandi
बुधवार, 13 जुलै 2016

घाई ‘पोस्ट‘ करण्या पटपट
"फेसबुका‘वरी सुरू झटापट
"ट्विटर‘वरीही चिवचिवाट
...पाऊस कोसळू लागतो जेव्हा।

झारा घेऊनी कळ्या पाडिती
लाडू गोड शब्दांचे वळिती
कविता कविता तयां म्हणती
...पाऊस कोसळू लागतो जेव्हा।

चिंब चिंब साऱ्या "भिंती‘
अवघे एकमेकां "लाईकती‘
आणिक "कमेंटा‘ही बरसती
...पाऊस कोसळू लागतो जेव्हा।

कुर्रुमकुर्रुम कांदा भजी अहाहा!
खमंग बटाटवडा नि चिवडा पाहा
कपात वाफाळता आल्याचा चहा
...पाऊस कोसळू लागतो जेव्हा।

घाई ‘पोस्ट‘ करण्या पटपट
"फेसबुका‘वरी सुरू झटापट
"ट्विटर‘वरीही चिवचिवाट
...पाऊस कोसळू लागतो जेव्हा।

झारा घेऊनी कळ्या पाडिती
लाडू गोड शब्दांचे वळिती
कविता कविता तयां म्हणती
...पाऊस कोसळू लागतो जेव्हा।

चिंब चिंब साऱ्या "भिंती‘
अवघे एकमेकां "लाईकती‘
आणिक "कमेंटा‘ही बरसती
...पाऊस कोसळू लागतो जेव्हा।

कुर्रुमकुर्रुम कांदा भजी अहाहा!
खमंग बटाटवडा नि चिवडा पाहा
कपात वाफाळता आल्याचा चहा
...पाऊस कोसळू लागतो जेव्हा।

गाऊही लागते "आकाशवाणी‘
मनात दडलेली पाऊसगाणी
फिरुनी जाग्या जुन्या आठवणी
...पाऊस कोसळू लागतो जेव्हा।

वर्षासहलींचे आखले जातात बेत
आंबोली, भुशी डॅम, भंडारदरा थेट
जिवाच्या जिवलगांची तिथेच भेट
...पाऊस कोसळू लागतो जेव्हा।

डबकी रस्त्यात साचतात
लेकरे खट्याळ नाचतात
कागदी नावा हळूच बुडतात
...पाऊस कोसळू लागतो जेव्हा।

कोठे कधी कोसळती झाडे
खचून जाई भिंत, पत्राही उडे
गोरगरिबांचे संसार ते उघडे
...पाऊस कोसळू लागतो जेव्हा।
 

थकले पाय, कोंडून गेला दम
घोटभर पाण्यासाठी किती श्रम
बाया-पोरांना थोडासा आराम
...पाऊस कोसळू लागतो जेव्हा।

ओढे खळाळती, नद्याही वाहती
नवे नवे पाणी धरणाचिया पोटी
हसू हळू फुटे कुणब्याच्या ओठी
...पाऊस कोसळू लागतो जेव्हा।

नका थांबू, करू आता जुपणी
जल्दी करा, सुरू भाताची आवणी
चाड्यावरी मूठ, खरिपाची पेरणी
...पाऊस कोसळू लागतो जेव्हा।

आधी उगवे, उदंड पिके
शेत-शिवाराचे पांग फिटे
डोळ्यांमध्ये स्वप्न मोठे
...पाऊस कोसळू लागतो जेव्हा।

अवकाळ हटला, चेहरे हसरे
हिर्वीहिर्वीगार गावची शिवारे
जगण्याच्या आशेला नवे धुमारे
...पाऊस कोसळू लागतो जेव्हा।
...पाऊस कोसळू लागतो तेव्हा।।

Web Title: dhing tang british nandy